• Download App
    तेव्हा तुमची आई देश विकत होती का? स्मृति ईराणी यांचा राहूल गांधींवर पलटवार|Was your mother selling the country then? Smriti Irani's retaliation against Rahul Gandhi

    तेव्हा तुमची आई देश विकत होती का? स्मृति ईराणी यांचा राहूल गांधींवर पलटवार

    विशेष प्रतिनिधी

    नवी दिल्ली : संयुक्त पुरोगामी लोकशाही आघाडी सरकारच्या काळात एक्सप्रेस वे पासून अनेक प्रकल्पांचे खासगीकरण झाले. कॉँग्रेसच्या सरकारच्या प्रमुख असलेल्या तुमच्या आई सोनिया गांधी यांनी देश विकत होत्या का? असा पलटवार केंद्रीय मंत्री स्मृति ईराणी यांनी राहूल गांधी यांच्यावर केला आहे.Was your mother selling the country then? Smriti Irani’s retaliation against Rahul Gandhi

    मोदी सरकार पारदर्शकतेने देशाच्या तिजोरीत भर टाकत आहे. कॉँग्रेसने मात्र लुटारूंना साथ दिली होती, असेही त्या म्हणाल्या.राहूल गांधी यांनी केंद्राच्या राष्ट्रीय विमुद्रीकरण पाईपलाईन योजनेवर टीका करताना मोदी सरकारने देश विकायला काढला आहे, अशी टीका केली होती.



    याबाबत स्मृति ईराणी म्हणाल्या, कॉँग्रेसच्या नेतृत्वाखालील सरकारने २००८ मध्ये नवी दिल्ली रेल्वे स्टेशनचे खासगीकरण केले होते. त्यावेळी आपल्या आई देश विकत होत्या का? कॉँग्रेसच्या नेतृत्वाखालील विविध राज्यांतील सरकारे खासगीकरणाच्या माध्यमातून निधी उभा करत आहेत. ते आपल्या राज्यांना विकत आहेत का?

    ईराी म्हणाल्या, पुणे-मुंबई एक्सप्रेस वेचे आठ हजार कोटी रुपयांचे खासगीकरण करण्यात आले होते. त्यावेळी महाराष्ट्र सरकारने एक्सप्रेस वे विकला होता असे राहूल गांधींना म्हणायचे आहे का? २००६ मध्ये देशात विमानतळांच्या खासगीकरणाला सुरूवात करण्यात आली. त्यावेळी सोनिया गांधी सरकार चालवित होत्या. रस्ते, रेल्वे आणि विमानतळेही त्यावेळी विकून टाकली असे राहूल गांधी यांना म्हणायचे आहे का?

    Was your mother selling the country then? Smriti Irani’s retaliation against Rahul Gandhi

    महत्त्वाच्या बातम्या

     

    Related posts

    Kamal Rashid Khan : गोळीबार प्रकरणात अभिनेता कमाल रशीद खान ताब्यात; ओशिवरा पोलिस ठाण्यात आणले, निवासी इमारतीवर गोळ्या झाडल्याचा आरोप

    Anil Ambani : अनिल अंबानींवर ₹1.5 लाख कोटींच्या घोटाळ्याचा आरोप; सर्वोच्च न्यायालयाने नोटीस बजावली; CBI-ED कडून 10 दिवसांत सीलबंद अहवाल मागवला

    Kathua Encounter : जम्मू-काश्मीरच्या कठुआमध्ये जैशचा दहशतवादी ठार; अमेरिका मेड M4 रायफल जप्त