• Download App
    महागाई कमी करायचीय?, भाजपला उत्तर प्रदेशसह पाच राज्यांमध्ये हरवा!!; काँग्रेसने सांगितला उपाय |Want to reduce inflation ?, Defeat BJP in five states including Uttar Pradesh !!; The solution suggested by the Congress

    महागाई कमी करायचीय?, भाजपला उत्तर प्रदेशसह पाच राज्यांमध्ये हरवा!!; काँग्रेसने सांगितला उपाय

    वृत्तसंस्था

    नवी दिल्ली : केंद्र सरकारने विविध वस्तूंवरला जीएसटी प्रचंड वाढवून छोटे व्यापारी शेतकरी यांच्यावर “मोदी टॅक्स” लादला आहे. जर महागाई कमी करायची असेल तर एकच उपाय आहे,Want to reduce inflation ?, Defeat BJP in five states including Uttar Pradesh !!; The solution suggested by the Congress

    तो म्हणजे पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकांमध्ये भाजपला हरवा. मोदी सरकार आपोआप टॅक्स कमी करून महागाई घटवेल, अशा शब्दांत काँग्रेसने मोदी सरकारचे वाभाडे काढले आहेत.



    2022 नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशीच

    दैनंदिन पत्रकार परिषदेत काँग्रेसचे प्रवक्ते रणदीप सुरजेवाला यांनी जीएसटी वाढविण्याच्या मुद्द्यावरून केंद्रातील मोदी सरकारला घेरले आहे.वस्त्रोद्योगापासून ते सर्वसामान्य वापरत

    असलेल्या चप्पल बूटांपर्यंत केंद्र सरकारने जीएसटी 5 टक्क्यांवरून वाढवून 12 टक्क्यांवर केला आहे. हा “मोदी टॅक्स” देशातल्या गरीब आणि मध्यमवर्गीय जनतेच्या गळ्याला बसलेला फास आहे, असा आरोप सुरजेवाला यांनी केला आहे.

    बाकी कोणत्या उपायांनी महागाई कमी करता येईल असे वाटत नाही. रस्त्यावर उतरून नुसती आंदोलने करून भागणार नाही तर उत्तर प्रदेशसह पाच राज्यांमध्ये विधानसभांच्या निवडणुकांमध्ये भाजपला जोरदार धक्का देऊन पराभूत केले पाहिजे

    तरच पंतप्रधान नरेंद्र मोदी हे त्यातून कदाचित धडा घेऊन टॅक्स कमी करतील आणि त्यामुळे महागाई कमी होईल, असा दावा देखील सुरजेवाला यांनी केला आहे. सुरजेवाला यांनी पत्रकार परिषदेत विविध वस्तूंवरील टॅक्स किती होता आणि किती केला आहे याची यादीच वाचून दाखविली.

    Want to reduce inflation ?, Defeat BJP in five states including Uttar Pradesh !!; The solution suggested by the Congress

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    संदेशखालीमध्ये CBIची NSG कमांडोसह झाडाझडती; अनेक ठिकाणी शस्त्रे व दारूगोळा सापडला

    विजय माल्ल्याला फ्रान्सच्या माध्यमातून परत आणण्याची तयारी; भारताने बिनशर्त प्रत्यार्पण मागितले

    खेळाडूंची स्ट्रेंथ वाढवण्यासाठी पीसीबीचा अजब फॉर्म्युला; पाक क्रिकेटपटूंना कठोर लष्करी प्रशिक्षण, डोंगर चढायला लावले, 3 जखमी