विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : नारीशक्ती वंदन अधिनियम संमत करून घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदींनी माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांचे स्वप्न साकार केले आहे, अशा शब्दांमध्ये राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्षा विजयाताई रहाटकर यांनी मोदी सरकारचे कौतुक केले.
राष्ट्रीय महिला आयोगाने राजधानी नवी दिल्लीतील विज्ञान भवनात आयोजित केलेल्या नारी शक्ती वंदन कार्यक्रमात विजयाताई रहाटकर यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींचे स्वागत केले. महिलांच्या नेतृत्वाखाली विकास या संकल्पनेचे स्वप्न मोदी सरकारने साकार केल्याचे त्यांनी सांगितले.
जर महिला या संपूर्ण सृष्टीचे 50% अवकाश व्यापतात, तर त्या एक तृतीयांश राजकीय क्षेत्र व्यापू शकत नाहीत का??, असा दिव्य विचार श्रद्धेय अटल बिहारी वाजपेयी यांनी मांडला होता. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी श्रद्धेय अटलजींचे ते स्वप्न साकार केले आहे. नारीशक्ती वंदन अधिनियम केवळ लोकसभा आणि विधानसभेत महिलांची संख्या वाढवायचे विधेयक नाही, तर महिलांना निर्णय प्रक्रियेपासून दूर ठेवण्याचा वर्षानुवर्षांचा विचार बदलण्याचे हे महत्त्वपूर्ण पाऊल आहे. यातून केवळ संख्यात्मक वाढ होणार नाही, तर सर्व प्रकारच्या निर्णय प्रक्रियेतील संवेदनशीलतेत वाढ होईल, असा विश्वास विजयाताई राहटकर यांनी व्यक्त केला.
#WATCH | Delhi: At the 'Nari Shakti Vandan Sammelan' at Vigyan Bhawan, National Commission for Women, Chairperson Vijaya Rahatkar says, “Atal Bihari Vajpayeeji had said, "Women hold up half the sky, so shouldn't they hold at least one third of the political ground?" Prime… https://t.co/mqJJKAH0Du pic.twitter.com/ugQZpi86JH — ANI (@ANI) April 13, 2026
#WATCH | Delhi: At the 'Nari Shakti Vandan Sammelan' at Vigyan Bhawan, National Commission for Women, Chairperson Vijaya Rahatkar says, “Atal Bihari Vajpayeeji had said, "Women hold up half the sky, so shouldn't they hold at least one third of the political ground?" Prime… https://t.co/mqJJKAH0Du pic.twitter.com/ugQZpi86JH
— ANI (@ANI) April 13, 2026
संसदेच्या अधिवेशनापूर्वी मोदींचा political twist!!;
नारीशक्ती वंदन अधिनियम घटनादुरुस्ती मंजूर करून घेण्यासाठी संसदेचे विशेष अधिवेशन होत असताना काँग्रेस सह सर्व विरोधकांनी संबंधित विधेयकाला विरोधाचे भूमिका घेतली, पण महिला आरक्षण 2029 मध्येच लागू करण्यासाठी विरोधकांनी आग्रह धरल्याचा ट्विस्ट पंतप्रधान नरेंद्र मोदींनी या कार्यक्रमात दिला. या कार्यक्रमाला लोकसभेच्या माजी अध्यक्ष आणि काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्या मीरा कुमार उपस्थित राहिल्या.
नारीशक्ती वंदन अधिनियम घटनादुरुस्तीसाठी 16 एप्रिल ते 18 एप्रिल अशा तीन दिवसांमध्ये संसदेचे विशेष अधिवेशन होत असतात यांनी मोदी सरकार आणि बाकीचे विरोधक यांनी परस्पर विरोधी भूमिका घेतली. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी एकमेकांना पत्रे लिहिली. नारीशक्ती वंदन अधिनियमाच्या नावाखाली मोदी सरकार लोकसभेची फेररचना करून मतदारसंघ वाढवायचा प्रयत्न करतंय, ते घटनाबाह्य असल्याचा दावा काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी केला. त्यांना काँग्रेस आणि बाकीच्या विरोधी पक्षांच्या खासदारांची साथ मिळाली.
– काँग्रेसच्या खासदारांचा आरोप
नारीशक्ती वंदन अधिनियमाच्या नावाखाली मोदी सरकारला लोकसभेचे मतदार संघ वाढवायचे आहेत. त्यात तर भारतातले 200 तर दक्षिण भारतात फक्त 60 मतदारसंघ वाढवायचेत. असा आरोप काँग्रेसचे खासदार मणिक्कम टागोर यांनी केला.
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी संसदेतल्या सर्व पक्षांच्या नेत्यांना पत्र लिहून सरकारची भूमिका स्पष्ट केली. त्या पाठोपाठ आज राष्ट्रीय महिला आयोगाने राजधानी नवी दिल्लीतील विज्ञान भवनात आयोजित केलेल्या नारीशक्ती वंदन मेळाव्यात मोदींनी विरोधकांची सौम्य भाषेत कानउघडणी केली. संसदेने 2023 मध्ये इतिहास रचला. सर्व पक्षांनी मिळून नारीशक्ती वंदन अधिनियम विधेयक मंजूर केले. त्याचवेळी सर्व विरोधकांनी संबंधित कायदा 2029 मध्ये लागू करण्याचा आग्रह धरला होता. विरोधकांचा हा आग्रह सरकारने गांभीर्याने घेतला त्या दृष्टीने घटना बदल करण्यासाठी 16 एप्रिल ते 18 एप्रिल अशा तीन दिवसांमध्ये संसदेचे विशेष अधिवेशन बोलावले अशी माहिती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नारीशक्ती वंदन कार्यक्रमात दिली.
– विरोधकांच्या विसंगत भूमिकेवर बोट
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या या एकाच वक्तव्यामुळे विरोधकांच्या आधीच्या आणि नंतरच्या भूमिकेची पोलखोल झाली. 2023 मध्ये विरोधकांनीच आग्रह धरला होता की महिला आरक्षण 2019 मध्येच प्रत्यक्षात यावे पण ज्यावेळी मोदी सरकारने विशेष अधिवेशन बोलाविले त्यावेळी मात्र काँग्रेस सकट सगळ्या विरोधकांनी सरकारच्या प्रस्तावाला विरोध केलाय. यातल्या विसंगतीवरच आज मोदींनी विज्ञान भवनातल्या कार्यक्रमातून बोट ठेवले.
लोकसभेच्या माजी अध्यक्षा मीरा कुमार उपस्थित महिला आयोगाने आयोजित केलेल्या आजच्या कार्यक्रमाला लोकसभेच्या माजी अध्यक्ष आणि काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्या मीरा कुमार आवर्जून उपस्थित होत्या. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सुरुवातीलाच त्यांच्या उपस्थितीची दखल घेतली. मीरा कुमार यांच्यासारख्या काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्या या कार्यक्रमाला उपस्थित राहिल्याने त्याला वेगळे राजकीय महत्त्व प्राप्त झाले. काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी पंतप्रधानांना पत्र लिहिले त्यातून नारी शक्ती वंदन विधेयकातल्या काही बाबींना विरोध दर्शविला या पार्श्वभूमीवर मीरा कुमार यांची आजच्या कार्यक्रमाची उपस्थिती राजकीय दृष्ट्या वेगळे वळण देणारी ठरली.
महिला आयोगाने आयोजित केलेल्या आजच्या कार्यक्रमाला लोकसभेच्या माजी अध्यक्ष आणि काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्या मीरा कुमार आवर्जून उपस्थित होत्या. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सुरुवातीलाच त्यांच्या उपस्थितीची दखल घेतली. मीरा कुमार यांच्यासारख्या काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्या या कार्यक्रमाला उपस्थित राहिल्याने त्याला वेगळे राजकीय महत्त्व प्राप्त झाले. काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी पंतप्रधानांना पत्र लिहिले त्यातून नारी शक्ती वंदन विधेयकातल्या काही बाबींना विरोध दर्शविला या पार्श्वभूमीवर मीरा कुमार यांची आजच्या कार्यक्रमाची उपस्थिती राजकीय दृष्ट्या वेगळे वळण देणारी ठरली.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App