केंद्रीयमंत्री ज्योतिरादित्य सिंधियांना मातृशोक; माधवी राजे यांचे निधन

दिल्ली ‘एम्स’मध्ये उपचार सुरू आहेत.


विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली : केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांच्या आई माधवी राजे सिंधिया यांचे बुधवारी सकाळी दिल्लीतील एम्समध्ये निधन झाले. सूत्रांकडून ही माहिती समोर आली आहे. सकाळी 9.28 वाजता त्यांचे निधन झाले, गेल्या काही दिवसांपासून त्या व्हेंटिलेटरवर होत्या. न्यूमोनिया तसेच सेप्सिसने त्या त्रस्त होत्या अशी माहिती समोर आली आहे.Union Minister Jyotiraditya Scindias daughter Madhavi Raje passes away



माधवी राजे सिंधिया यांच्याबद्दल जाणून घ्या –
माधवी राजे या नेपाळच्या राजघराण्यातील होत्या. त्या धर्मादाय कार्यात खूप सक्रिय होत्या. माधवी राजे या 24 चॅरिटेबल ट्रस्टच्या अध्यक्षा होत्या जे शिक्षण आणि वैद्यकीय सेवा यासारख्या क्षेत्रात मदत करतात. त्या सिंधियास गर्ल्स स्कूलच्या बोर्ड ऑफ गव्हर्नर्सच्या अध्यक्षाही होत्या. त्यांनी आपले दिवंगत पती माधवराव सिंधिया यांच्या स्मृतीप्रित्यर्थ पॅलेस म्युझियममध्ये एक गॅलरीही तयार केली.

८ मे १९६६ रोजी ग्वाल्हेरचे तत्कालीन महाराज माधवराव सिंधिया यांच्याशी त्यांचा विवाह झाला. माधवराव सिंधिया यांची गणना देशातील शक्तिशाली नेत्यांमध्ये होते. हेलिकॉप्टर अपघातात त्यांचा मृत्यू झाला. माधवी सिंधिया या नेपाळच्या राजघराण्यातील होत्या. त्यांचे आजोबा समशेर जंग बहादूर नेपाळचे पंतप्रधान होते. माधवी राजे यांना राजकुमारी किरण राज्य लक्ष्मी देवी या नावानेही ओळखले जात होते.

Union Minister Jyotiraditya Scindias daughter Madhavi Raje passes away

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात