नाशिक : Annamalai भाजप सोडणार असल्याच्या अफवा की विरोधकांनी सोडल्या पुड्या??, आणि अमित शाह – अण्णामलाई यांची बॉडी लँग्वेज काय सांगते??, असे सवाल विचारायची वेळ अण्णामलाई यांच्याच आजच्या भेटीगाठी मधून समोर आली.
अण्णामलाई यांनी आज नवी दिल्लीत भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नवीन यांची भेट घेतली. त्यानंतर केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतली या भेटीचे फोटो प्रसार माध्यमांनी व्हायरल केले. त्यामुळेच वर उल्लेख केलेला अण्णामलाई भाजप सोडणार असल्याच्या अफवा की विरोधकांनी सोडल्या पुड्या??, हा सवाल समोर आला.
– नितीन नवीन यांच्याशी चर्चा
कारण अण्णामलाई यांना जर भाजप सोडायचाच असता आणि त्यांना भाजप सोडताना कुठली फक्त कटूता ठेवायची नसती, तर त्यांनी वेगळा पर्याय म्हणून मोठे पत्र लिहून किंवा मोठा मेसेज लिहून किंवा अन्य मार्गाने भाजप किंवा सोडून ते बाहेर पडले असते. पण अण्णामलाई यांनी तसे न करता थेट भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नवीन यांची भेट घेतली. त्यांच्याशी चर्चा केली पण ते एवढ्यावरच थांबले नाहीत. त्यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची सुद्धा भेट घेतली. नितीन नवीन आणि अमित शाह या दोघांनी सुद्धा अण्णामलाई यांना अपॉइंटमेंट देऊन त्यांची भेट घेतली. अण्णामलाई यांना भाजप सोडायचा असता, तर अमित शाह यांनी त्यांना भेटीसाठी अपॉइंटमेंट सुद्धा दिली नसती.
– अमित शाह भेटीची स्ट्रॅटेजी
पण ज्या अर्थी अमित शाह यांनी अण्णामलाई यांना अपॉइंटमेंट केली आणि त्यांची भेट घेतली, त्याचा अर्थच असा की, अण्णामलाई हे एकतर भाजप सोडणारच नाहीत किंवा भाजप सोडणार असतील आणि कुठला नवीन मार्ग चोखाळणार असतील, तर त्यांना अमित शाह आणि नितीन नवीन यांचा पाठिंबा असेल. किंबहुना अमित शाह यांची कुठली स्ट्रॅटेजी असेल म्हणूनच अण्णामलाई हे भविष्यासाठी वेगळ्या राजकीय पर्याय निवडतील!!
– भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाचा चुकला होरा
तामिळनाडू विधानसभेच्या निवडणुकीचे निकालच असे काही लागले की ज्यामुळे अण्णामलाई यांच्यासारखा नेता दुखावणे स्वाभाविक होते. तामिळनाडूतल्या जनतेचा जो रोष द्रविडी राजकारणावर दिसला. त्याचा लाभ एरवी अण्णामलाई आणि भाजप यांना घेता आला असता पण भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाने अण्णामलाई यांच्या नेतृत्वापेक्षा अण्णा द्रविड मुन्नेत्र कळमघ पक्षाचे नेते इडापड्डी पलानीस्वामी यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवला आणि तिथेच भाजपचा घात झाला. भाजपला तामिळनाडू निवडणुकीत अपेक्षित यश मिळू शकले नाही हा अण्णामलाई यांच्या नेतृत्वाचा दोष नव्हता, तर भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाने घेतलेल्या निर्णयाचा दोष होता. त्यामुळे अण्णामलाई कुठला वेगळा निर्णय घेत असतील तर तो त्यांचा दोष नसेल तो भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाचा दोष ठरेल.
– एकाच दिशेने प्रवासाची शक्यता
म्हणूनच मग अण्णामलाई यांनी कुठला निर्णय जाहीर करण्यापूर्वी नितीन नवीन आणि अमित शाह यांची भेट घेतली महत्त्वाचे म्हणजे या दोन्ही नेत्यांनी त्यांना अपॉइंटमेंट देऊन भेट दिली. त्यामुळेच अण्णामलाई आणि भाजप एकत्र राहून किंवा वेगवेगळे होऊन एकाच दिशेने राजकीय प्रवास करतील की काय??, याविषयी दाट संशय निर्माण झाला!!
Union Home Minister Amit Shah meets BJP leader K Annamalai in Delhi.
महत्वाच्या बातम्या
- एकनाथ शिंदे राष्ट्रवादीला कोकणात दणका द्यायच्या तयारीत; अनिकेत सुनील तटकरेंना निवडणूक अवघड!
- शेतकऱ्यांनी पेरणीची घाई करू नये; 10 जून पर्यंत मान्सूनच्या पावसाच्या आगमनाची शक्यता धूसर; IMD चा इशारा
- Malappuram : केरळ, कर्नाटक आणि तामिळनाडूत एनआयएचे १९ ठिकाणी छापे; मलप्पुरम स्फोटकसाठा प्रकरणात मोठी कारवाई
- Pune-Pimpri : पुणे-पिंपरी दारूकांडाचे धक्कादायक सत्य समोर; एकूण मृतांची संख्या 22 वर पोहोचली