• Download App
    Aniket Sunil Tatkare एकनाथ शिंदे राष्ट्रवादीला कोकणात दणका द्यायच्या तयारीत; अनिकेत सुनील तटकरेंना निवडणूक अवघड!!

    एकनाथ शिंदे राष्ट्रवादीला कोकणात दणका द्यायच्या तयारीत; अनिकेत सुनील तटकरेंना निवडणूक अवघड!!

    नाशिक : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे राष्ट्रवादी काँग्रेसला दणका द्यायच्या तयारीत असल्याची चिन्हे विधान परिषदेच्या निवडणुकीच्या निमित्ताने दिसली.

    विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी सुनील तटकरे यांनी आपला मुलगा अनिकेत तटकरे याच्यासाठी विधान परिषदेची जागा खेचून घेतल्याची बातमी आली. त्यासाठी सुनील तटकरे यांनी अनिकेत तटकरे याला एकनाथ शिंदे यांच्या भेटीला सुद्धा पाठविले होते. त्यामुळेच शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यात रायगड मध्ये पॉलिटिकल पॅचअप झाल्याच्या बातम्या आल्या.

    – जुईली दळवीचा अर्ज

    पण त्याचवेळी एकनाथ शिंदे यांनी आपल्या पक्षाच्या नेत्यांची बैठक बोलवून रायगड मधून महेंद्र दळवींच्या मुलीने जुईली दळवीने दाखल केलेला अर्ज मागे घेऊ नये, अशा सूचना दिल्या. त्यामुळेच एकनाथ शिंदे आता राष्ट्रवादीला दणका द्यायच्या तयारीत असल्याची चिन्हे दिसून आली.



    – सेनेच्या तीन आमदारांचा विरोध

    सुनील तटकरे यांनी कायमच रायगड मध्ये शिवसेनेच्या नेत्यांचे पाय खेचायचे काम केले. महेंद्र दळवी, महेंद्र थोरवे आणि भरत गोगावले या शिवसेना आमदारांना त्रास द्यायचे डाव खेळले. त्यामुळे या तिन्ही आमदारांनी एकनाथ शिंदे यांना कोणत्याही परिस्थितीत रायगड मधून माघार घेता कामा नये, असे बजावले. त्यामुळेच आता अनिकेत तटकरे यांनी भेट घेऊन सुद्धा एकनाथ शिंदे यांनी रायगड मधला अर्ज जुईली दळवीने मागे घेऊ नये अशा सूचना दिल्याचे समजते.

    – अनिकेतची निवडणूक अवघड

    जुईली दळवी हिने अर्ज मागे घेतला नाही तर अनिकेत तटकरे हे महायुतीचे उमेदवार न ठरता ते फक्त राष्ट्रवादीचे उमेदवार ठरतील आणि राष्ट्रवादीच्या लोकप्रतिनिधींच्या बळावर ते विधान परिषदेवर निवडून येणे कठीण होईल. अशा परिस्थितीत शिवसेना नेते सुनील तटकरे यांना रायगड मध्येच काटशह देऊन विधानसभा निवडणुकीत त्यांनी केलेल्या विश्वासघाताचा बदला घेतील. अर्थात विधान परिषद निवडणुकीचे अर्ज मागे घेईपर्यंत महायुती हे सगळे राजकारण पुढे खेचत आणि रंगत जाईल.

    Elections will be difficult for Aniket Sunil Tatkare!!

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    शेतकऱ्यांनी पेरणीची घाई करू नये; 10 जून पर्यंत मान्सूनच्या पावसाच्या आगमनाची शक्यता धूसर; IMD चा इशारा

    गरीब नगर मधील कारवाईचा बदला घेण्यासाठी दहशतवादी हल्ल्याचे कारस्थान; दिल्लीत नऊ आरोपींच्या अटकेनंतर धक्कादायक खुलासा!!

    Pune-Pimpri : पुणे-पिंपरी दारूकांडाचे धक्कादायक सत्य समोर; एकूण मृतांची संख्या 22 वर पोहोचली