Mukesh Rajput : भाजपचे दोन खासदार पायऱ्यांवरून पडले; मुकेश राजपूत आयसीयूमध्ये दाखल, सारंगींवरही उपचार सुरू

Mukesh Rajput

काँग्रेस नेते राहुल गांधींवर केले आहेत आरोप


विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली : Mukesh Rajput  संसदेचे हिवाळी अधिवेशन सुरू आहे. अधिवेशनाच्या 19 व्या दिवशी प्रचंड गदारोळ सुरू आहे. यादरम्यान भाजप खासदार प्रताप सिंह सारंगी जखमी झाले. विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्या धक्का लागल्यामुळे ते पडले आणि जखमी झाल्याचा दावा त्यांनी केला आहे. मी पायऱ्यांवर उभा होतो, यावेळी राहुल यांनी एका खासदाराला धक्का दिला आणि खासदार माझ्यावर पडले. त्यामुळे मी पडलो आणि जखमी झालो. असा दावा प्रताप सिंह सारंगी यांनी केला आहे.Mukesh Rajput

सारंगी यांच्याशिवाय भाजप खासदार मुकेश राजपूतही जखमी झाले आहेत. त्याची प्रकृती गंभीर आहे. त्यांना राम मनोहर लोहिया रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. ते आयसीयूमध्ये आहेत.



प्रताप सिंह सारंगी यांच्या आरोपांवर राहुल गांधी यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाला की हो मी केले आहे, ते ठीक आहे… धक्का दिल्याने काही होत नाही. मला संसदेच्या आत जायचे होते. संसदेत जाणे हा माझा अधिकार आहे. मला रोखण्याचा प्रयत्न झाला. आम्हाला संसदेत जाण्यापासून रोखण्यात आले आहे. भाजप खासदार धक्काबुक्की करत होते. राहुल पुढे म्हणाले की, ते संसदेचे प्रवेशद्वार आहे आणि भाजपचे खासदार मला धक्काबुक्की करत होते. मला धमक्या देत होते. भाजप खासदार सारंगी यांना तातडीने दिल्लीतील राम मनोहर लोहिया रुग्णालयात नेण्यात आले. केंद्रीय मंत्री पीयूष गोयल, धर्मेंद्र प्रधान आणि अर्जुन राम मेघवाल त्यांना पाहण्यासाठी रुग्णालयात पोहोचले आहेत.

गृहमंत्री अमित शहा यांच्या विधानावरून आज संसदेत प्रचंड गदारोळ झाला. विरोधक त्यांच्या राजीनाम्याची मागणी करत आहेत. यासाठी विरोधकांनी आज संसदेवर मोर्चा काढला. यावेळी विरोधी पक्षाच्या खासदारांनी हातात डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो धरला होता.

Two BJP MPs fall from stairs Mukesh Rajput admitted to ICU Sarangi also undergoing treatment

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात