• Download App
    ट्विटर पक्षपाती, सरकारच्या दबावाखाली; विरोधकांचा आवाज दाबला तर ट्विटरच्या गुंतवणुकीवर परिणाम होऊ शकतो; राहुल गांधींचा ट्विटरवर हल्लाबोल। Twitter biased, under government pressure; Suppressing the voice of the opposition could affect Twitter's investment; Rahul Gandhi's attack on Twitter

    ट्विटर पक्षपाती, सरकारच्या दबावाखाली; विरोधकांचा आवाज दाबला तर ट्विटरच्या गुंतवणुकीवर परिणाम होऊ शकतो; राहुल गांधींचा ट्विटरवर हल्लाबोल

    वृत्तसंस्था

    नवी दिल्ली : सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ट्विटर पक्षपाती आहे. सध्याच्या सरकारच्या दबावाखाली ते काम करते आहे. देशातल्या राजकीय व्यवस्थेत हस्तक्षेप करते आहे, अशा शब्दांत काँग्रेसचे वायनाडचे खासदार राहुल गांधी यांनी हल्लाबोल केला आहे. Twitter biased, under government pressure; Suppressing the voice of the opposition could affect Twitter’s investment; Rahul Gandhi’s attack on Twitter

    देशात लोकशाही धोक्यात आहे. सरकार संसदेत आम्हाला बोलू देत नाही. ट्विटरसारख्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर आम्हाला काही मते मांडता येत होती. परंतु आता ट्विटर जर सरकारच्या दबावाखाली येऊन आमची अकाउंट बंद करणार असेल तर याला लोकशाहीची हत्या म्हणायचे नाही तर काय म्हणायचे?, असा सवाल राहुल गांधी यांनी केला आहे.



    राहुल गांधी यांचे ट्विटर अकाउंट बंद करण्यात आले होते. त्यानंतर रणजीतसिंग सुरजेवाला यांच्यासह काही काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांचे ट्विटर अकाऊंट्स काही काळासाठी बंद करण्यात आली होती. महाराष्ट्रात बाळासाहेब थोरात, नाना पटोले या काँग्रेस नेत्यांची ट्विटर अकाऊंट्स काहीकाळ बंद करण्यात आली होती.

    या पार्श्वभूमीवर राहुल गांधी यांनी ट्विटर आणि केंद्रातल्या मोदी सरकारवर टीकास्त्र सोडले आहे. ते म्हणाले, की सरकार संसदेत विरोधकांचा आवाज दाबते. सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर नियंत्रण ठेवते. या कंपन्यांना भारतात बिझनेस करायचा असल्यामुळे त्या सरकारच्या दबावाखाली येतात. पक्षपाती बनतात. पण त्यांनी हे लक्षात ठेवले पाहिजे की विरोधी पक्ष सदस्यांच्या सोशल मीडिया अकाउंट्सवर देखील कोट्यावधी फॉलोअर्स आहेत. ते संबंधित सोशल मीडिया कंपनीवर नाराज झाले तर त्याचा फटका त्या कंपनीच्या गुंतवणुकीला सुद्धा बसू शकतो. गुंतवणूकदार त्या कंपनीकडे पाठ फिरवू शकतात, असा गर्भित इशारा देखील राहुल गांधी यांनी दिला. एकाच वेळी त्यांनी केंद्रातले मोदी सरकार आणि ट्विटर यांना घेरण्याचा प्रयत्न केला.

    Twitter biased, under government pressure; Suppressing the voice of the opposition could affect Twitter’s investment; Rahul Gandhi’s attack on Twitter

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    मोदी सरकारचा कांदा उत्पादकांना मोठा दिलासा, तब्बल 99 हजार 150 मेट्रिक टन कांदा निर्यातीस दिली परवानगी

    उत्तराखंडच्या जंगलात भीषण आग; लष्कराला पाचारण, हवाई दलाच्या MI-17 हेलिकॉप्टरमधून पाण्याचा मारा

    शरद पवार यांचा इशारा, शशिकांत शिंदेंना अटक सहन होणार नाही; अवघा महाराष्ट्र पेटून उठेल