विशेष प्रतिनिधी
कोलकत्ता : तृणमूल कॉँग्रेसची खासदार आणि बंगाली अभिनेत्री नुसरत जहाँ आई होणार आहे. मात्र, तिचा पती निखल जैन याने हे मूल आपले नसल्याचे म्हटल्याने आता पिता कोण याचीच चर्चा रंगलीआहे. नुसतर आणि तिचे पती निखिल जैन यांच्या वैवाहिक नात्यात कटुता आली आहे. निखिल जैनने नुसरतच्या पोटात असलेल्या मुलाचा बाप नसल्याचा धक्कादायक खुलासा केला होता.Trinamool MP actress Nusrat Jahan will be the mother, but more discussion about who the father is
सहा महिन्यांपासून आपण एकत्रही राहत नसल्याचे म्हटले होते. नुसरत जहाँ ही प्रेग्नंट असून हॉस्पिटलमध्ये दाखल झाली आहे. डॉक्टरांनी तिला 26 आॅगस्टची डिलिव्हरी डेट दिली आहे.हा विवाह वैध नसल्याचे सांगत आहे. गेल्या काही काळापासून नुसरत आणि निखिल यांच्यात मतभेद झाल्याच्या बातम्या येत होत्या.
आपण एकत्र राहत नसल्याचे नुसरतचा पती निखिल याने सांगितले आहे. याचदरम्यान नुसरत गर्भवती असल्याची चचार्ही सुरू झाली होती. त्यावर प्रतिक्रिया देताना निखिलने याबाबत आपल्याला माहिती नसल्याचे तसेच ती गर्भवती असेल तर ते मुल त्याचे नसल्याचे म्हटले होते.
दुसरीकडे नुसरतच्या मुलाचा बाप कोण, यावरून चर्चा सुरु झाली होती. अभिनेता यश दासगुप्ताला ती डेट करत होती. मंगळवारीच दोघांनी एक इन्स्टाग्राम स्टोरी शेअर केली होती. यामुळे ते दोघे फिरायला गेले होते, असे म्हटले जात आहे. आता मुलाला जन्म दिल्यावर त्याचा खरा पिता कोण ते कळण्याची शक्यता आहे.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App