• Download App
    Muslims मुसलमानांच्या वाढत्या लोकसंख्येला नमाजासाठी मशिदी कमी पडताहेत, म्हणून रस्त्यावर नमाज; पवार आणि ममता प्रेमी मुस्लिम नेत्याचा कांगावा!!

    मुसलमानांच्या वाढत्या लोकसंख्येला नमाजासाठी मशिदी कमी पडताहेत, म्हणून रस्त्यावर नमाज; पवार आणि ममता प्रेमी मुस्लिम नेत्याचा कांगावा!!

    नाशिक : मुसलमानांच्या वाढत्या लोकसंख्येला माझ्यासाठी मशिदी कमी पडत आहेत म्हणून रस्त्यावर नमाज पठण करावे लागते, असा कांगावा पवार आणि ममता प्रेमी मुस्लिम नेत्याने आज केला. ज्येष्ठ वकील असलेल्या या नेत्याने अप्रत्यक्षपणे रस्त्यावरच्या नमाजाचे समर्थन केले.

    किरीट सोमय्यांचे पत्र

    त्यासाठी निमित्त ठरले किरीट सोमय्यांनी मुंबईच्या पोलीस आयुक्तांना लिहिलेले पत्र. मुंबईतल्या रस्त्यांवर नमाज पठणास बंदी घालावी अशी मागणी किरीट सोमय्यांनी त्या पत्रात केली. त्यामुळे एकेकाळी शरद पवारांच्या राष्ट्रवादीत असलेले आणि आता ममता बॅनर्जींच्या तृणमूळ काँग्रेसमध्ये असलेले नेते माजिद मेमन चिडले. त्यांनी किरीट सोमय्या यांना नेमका अधिकारच काय??, असा संतप्त सवाल केला. पण त्या पलीकडे जाऊन माजिद मेमन यांनी मुस्लिमांच्या वाढत्या लोकसंख्येला नमाजासाठी मशिदी कमी पडतात म्हणून मुसलमान रस्त्यावर नमाज पढतात, असा कांगावा केला.

    हे तेच माजिद मेमन आहेत, ज्यांनी मुंबई बॉम्बस्फोटातल्या आरोपींची खटले हायकोर्ट आणि सुप्रीम कोर्टात लढविले होते. त्यानंतर शरद पवारांनी त्यांना राज्यसभेच्या खासदारकीची बक्षिशी दिली होती. पण मध्यंतरी शरद पवारांशी फाटल्यानंतर माजिद मेमन यांनी ममता बॅनर्जींच्या तृणमूळ काँग्रेसशी राजकीय सोयरीक जमवली.

    माजिद मेमनकडून रस्त्यावरच्या नमाजाचे समर्थन

    आज त्याच माजिद मेमन यांनी रस्त्यावरच्या नमाजाचे अप्रत्यक्ष समर्थन केले. गेल्या दहा वीस वर्षांमध्ये मुस्लिमांची लोकसंख्या वाढली आहे. तेवढ्या प्रमाणावर मशिदींच्या बांधकामांना परवानगी दिली नाही. त्यामुळे वाढत्या लोकसंख्येच्या मुसलमानांना मशिदी नमाज पठणासाठी कमी पडतात म्हणून मुसलमान रस्त्यांवर नमाज पढतात, असे माजिद मेमन म्हणाले. पण त्यानंतर त्यांनी लगेच वेगळी मखलाशी सुद्धा केली. मुसलमानांना रस्त्यावर नमाज पढायची हौस नाही. मुसलमानांना गैर मुस्लीमांची गैरसोय करण्याचेही कारण नाही. पण मशिदी कमी पढतात म्हणूनच मुसलमान रस्त्यावर नमाज पढतात, असे स्पष्टीकरण त्यांनी दिले.

    वाजविली धोक्याची घंटा

    पण त्या पलीकडे जाऊन मुस्लिमांच्या वाढत्या लोकसंख्येची त्यांनी कबुली दिली हीच बाब संपूर्ण देशाच्या सुरक्षेसाठी गंभीर ठरली. एकीकडे मोदी सरकारच्या काळात मुसलमान असुरक्षित झाल्याची बतावणी केली गेली. त्याला अगदी आंतरराष्ट्रीय प्रसिद्ध मिळवून दिली गेली. पण प्रत्यक्षात याच कालावधीत मुसलमानांची लोकसंख्या वाढली. त्या लोकसंख्या वाढीला कुठेही अटकाव करण्यात आला नाही, हेच राजकीय सत्य माजिद मेमन यांच्यासारख्या पवार आणि ममता प्रेमी मुस्लिम नेत्याच्या तोंडून बाहेर आले. माजिद मेमन यांनी हिंदूंसाठी अप्रत्यक्षपणे धोक्याची घंटाच वाजविली.

    TMC leader Majeed Memon says, “It is right that Muslims should not offer namaz on roads

    महत्वाच्या बातम्या

     

    Related posts

    Kerala Monsoon : मान्सून 2-3 दिवसांत केरळममध्ये पोहोचेल; देशभरातील उष्णतेची लाट संपली; राजस्थानमधील 3 जिल्ह्यांमध्ये गारपीट

    Surya Chauhan : बकरी ईदच्या दिवशी झालेल्या हत्याकांडातील मुख्य आरोपी असद पोलिस चकमकीत ठार; सूर्या चौहान प्रकरणाला नवे वळण

    Pune Hooch Tragedy : पुणे विषारी दारू प्रकरणात दोन पोलिस अधिकारी निलंबित; आरोपींशी संबंधांचा संशय, मृतांचा आकडा २४ वर