• Download App
    मोहम्मद अली जिना ज्या लोकांसाठी महापुरुष आहेत, त्यांनी तत्काळ देश सोडून निघून जावे, इंद्रेश कुमार यांची टीका|Those should leave country who thinj Jinna narional leader

    मोहम्मद अली जिना ज्या लोकांसाठी महापुरुष आहेत, त्यांनी तत्काळ देश सोडून निघून जावे, इंद्रेश कुमार यांची टीका

    विशेष प्रतिनिधी

    वाराणसी : मोहम्मद अली जिना ज्या लोकांसाठी महापुरुष आहेत, त्यांनी तत्काळ देश सोडून निघून जावे, असे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे वरिष्ठ प्रचारक इंद्रेश कुमार यांनी म्हटले आहे.काशी विद्यापीठाच्या ललित कला विभागाच्या एका कार्यक्रमाला इंद्रेश कुमार यांनी उपस्थिती लावली. त्यावेळी ते बोलत होते.Those should leave country who thinj Jinna narional leader

    ते म्हणाले, मोहम्मद अली जिना ज्यांना महापुरुष वाटतात, त्यांनी तातडीने देश सोडावा. भारत आणि भारतीयांवर ओझे होऊन उगाचच येथे राहू नये. जिनाप्रेमी लोकांनी तत्काळ भारत सोडला तरी चालेल. दुसऱ्यांना चुकीचे सिद्ध करण्यासाठी निराधार आरोप करणे किंवा दावे करणे चुकीचे आहे.



    बनारस हिंदू विश्वविद्यापीठाच्या अंतरात्म्यात महामना मालवीय आहेत. त्यांची जागा कुणीही घेऊ शकत नाही, असे इंद्रेश कुमार यांनी मालवीय यांचा फोटो हटवून अल्लामा इकबाल यांचा लावल्याप्रकरणावर प्रतिक्रिया देताना सांगितले. सारे जहां से अच्छा गीत लिहिणार इकबाल पाकिस्तानात गेले, तेव्हा त्यांना या गीताचा अर्थ समजला नाही का, अशी टीकाही त्यांनी केली.

    समाजवादी पक्षाचे राष्टीय अध्यक्ष अखिलेश यादव यांनी एका सभेत मोहम्मद अली जिना यांच्याबाबत केलेल्या विधानामुळे वाद झाला होता. जिना यांना देशाचे पंतप्रधान केले असते तर फाळणी टळली असती असे ते म्हणाले होते.

    Those should leave country who thinj Jinna narional leader

    महत्त्वाच्या बातम्या

     

    Related posts

    Delhi Turkman Gate : दिल्लीत मध्यरात्री पोलीस-MCD पथकावर दगडफेक; मशिदीजवळ अवैध बांधकाम हटवण्यासाठी पोहोचले होते

    Election Commission : 12 राज्यांमध्ये SIR- मसुदा यादीत 13% मतदार कमी झाले; UP मध्ये सर्वाधिक 2.89 कोटी मतदार यादीतून वगळले

    Supreme Court : सुप्रीम कोर्टाने म्हटले- रस्ते भटक्या कुत्र्यांपासून मोकळे करणे आवश्यक; ते अपघातांना कारणीभूत