• Download App
    Ram Mandir राम मंदिरात चोरी झाली, बरे झाले; विरोधकांचे सनातन धर्मावरचे प्रेम उफाळून वर आले!!

    राम मंदिरात चोरी झाली, बरे झाले; विरोधकांचे सनातन धर्मावरचे प्रेम उफाळून वर आले!!

    राम मंदिरात चोरी झाली, बरे झाले; विरोधकांचे सनातन धर्मावरचे प्रेम उफाळून वर आले!!, देशातल्या सर्व विरोधकांच्या राजकीय वर्तणुकीतून आली.

    अयोध्येचा राम मंदिरात गेली चार वर्षे चोरी होत होती. त्यानिमित्ताने प्रशासनातली ढिलाई समोर आली. चंपत राय यांच्यापासून ते गोपाल राव यांच्यापर्यंत सगळे पदाधिकारी गोत्यात आले. त्यांच्यावरच्या संस्कारांचे वाभाडे निघाले. राम मंदिराच्या प्रशासनात फक्त निष्ठा होती, पण कार्यपद्धतीत प्रोफेशनलिझमचा अभाव होता. जबाबदारी निश्चितीचा अभाव होता. कामात क्रमवारी नव्हती, या सगळ्या उणीवा समोर आल्या. त्यावर कायदेशीर आणि प्रशासकीय उपाययोजना करण्याची प्रक्रिया सुरू झाली. चोरी करणाऱ्या आठ लोकांना अटक झाली. त्यांना कठोर कायदेशीर शिक्षा करण्याची प्रक्रिया सुरू झाली. चंपत राय आणि त्यांचे सहकारी सुरुवातीच्या कारवाईतून वाचले, असे चित्र निर्माण झाले असले, तरी कारवाईचा पुढचा टप्पा अजून बाकी आहे आणि चंपत राय आणि त्यांच्या सहकाऱ्यांवरची लटकती तलवार देखील कायम आहे.

    – सनातन धर्मावरील “प्रेमाची मशाल”

    पण याच दरम्यान आतापर्यंत राम मंदिराला शिव्या देणाऱ्या सगळ्या विरोधकांची सनातन धर्मावरील “प्रेमाची मशाल” एकदम पेटून निघाली. कारसेवकांना गोळ्या घालून ठार मारणाऱ्या मुलायम सिंग यादव यांच्या पुण्यापासून ते राहुल गांधींपर्यंत सगळे नेते अचानक सनातन धर्माचे अभिमानी झाले. या सगळ्यांना राम मंदिरातील चोरी बद्दल प्रचंड म्हणजे अगदीच अतिप्रचंड दुःख झाले. त्यांनी ते दुःख माध्यमांसमोर रडत रडत बोलून दाखवले. राम मंदिरातील चोरी या सगळ्या विरोधकांचे हृदय भंजन करून गेली. या सगळ्यांची हृदये विदीर्ण झाली. विरोधकांपैकी सगळ्या नेत्यांनी राम मंदिरातल्या चोरीला सनातन धर्मावरचा कलंक म्हटले. त्यामुळे देशातल्या सर्व सनातन हिंदू धर्मीयांचे डोळे उघडले. सर्व सनातन हिंदू धर्मीयांनी उघडलेले डोळे विस्फारून सगळ्या विरोधी नेत्यांकडे पाहिले. त्यावेळी त्यांना विरोधकांमधल्या सर्व सनातन धर्माच्या अभिमान्यांचे भेसूर चेहरे दिसले.



    – चोरी झाली नसती तर…

    एरवी राम मंदिरात चोरी झाली नसती, ती चोरी उघडकीस आली नसती, चोरी करणाऱ्यांविरुद्ध कायदेशीर कारवाई होऊन त्यांना अटक झाली नसती, तर कदाचित विरोधी नेत्यांपैकी कुणालाही राम मंदिराची आठवण सुद्धा झाली नसती, कोणीही राम मंदिराच्या पायऱ्या झिजवल्या नसत्या, कुणाचेही सनातन धर्माचे एवढे प्रेम उफाळून वर आले नसते. विरोधकांपैकी सगळे नेते गोल टोप्या घालून इफ्तार पार्ट्या झोडत बसले असते, पण ते राम मंदिराकडे बिलकुल फिरकले नसते. तसेही राम मंदिर संघ परिवाराने आणि भाजपनेच बांधले आहे त्यामुळे विरोधकांच्या नेत्यांनी त्या मंदिराकडे फिरकणे गैरवाजवीच दिसले असते. विरोधकांना राम मंदिराच्या जागी एक प्रचंड मोठे रुग्णालय हवे होते. तिथे रुग्णालय बांधले असते, तर विरोधी सगळे नेते राजकारण सोडून “रुग्णसेवेत” “दंग” झाले असते!!

    – राम मंदिर कुणाचे??

    पण नेमके संघ परिवाराने विरोधकांचे ऐकले नाही अयोध्यातल्या वादग्रस्त जागी रेटून राम मंदिर बांधले. त्यामुळे विरोधी नेत्यांपैकी कुणीच तिकडे फिरकले नाही. संघ परिवाराच्या राम मंदिरात आपण जायचेच कशाला??, असा प्रश्न त्यांना पडला आणि नाही जायचे असाच त्यांनी “पण” केला होता.

    – विरोधी राजकारणाचा आसमंत उजळला!!

    पण तो “पण” केवळ राम मंदिरातल्या चोरीमुळे त्यांना मोडावा लागला. म्हणून मग अरविंद केजरीवाल सुद्धा राम मंदिरात रामाच्या दर्शनाला जाऊन पोहोचले. अखिलेश यादव यांना सुद्धा रामाचे दर्शन घ्यावेसे वाटले. संजय सिंग यांचे राम प्रेम उफाळून आले. विरोधकांपैकी इतर नेत्यांना सुद्धा राम मंदिरासमोर रांगेत उभे राहावेसे वाटले. हा आणि असला प्रकार केवळ राम मंदिरात चोरी झाल्यामुळे घडून आला. अन्यथा विरोधकांची रामभक्ति आणि सनातन धर्मावरची भक्ती “सुप्तावस्थेतच” राहिली असती. ती लोकांना कधी दिसलीच नसती. लोकांना फक्त विरोधकांच्या डोक्यावरच्या गोल टोप्या दिसल्या असत्या, त्यांनी झोडलेल्या इफ्तार पार्ट्या दिसल्या असत्या. पण बरे झाले राम मंदिरात चोरी झाली आणि त्यामुळे विरोधी नेत्यांची सनातन धर्मावरच्या “प्रेमाची मशाल” पेटून निघाली. तिने विरोधी राजकारणाचा अवघा आसमंत उजळून काढला!! बाकी सरकार आणि संघ परिवार “फालतू” कायदेशीर कारवायांमध्ये अडकला!!

    A theft occurred at the Ram Mandir—and it turned out to be a good thing; the opposition’s love for Sanatan Dharma has surged to the surface!

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    Kudankulam : भारतातील सर्वात मोठ्या अणुऊर्जा प्रकल्पाचा डेटा लीक; दावा- हॅकर्सनी माहिती डार्क वेबवर टाकली

    कोलकत्याच्या सुभाष बाबू आंतरराष्ट्रीय विमानतळावरील बांकरा मशिद हलवायचा निर्णय घेताच बंगाल मधल्या माजी मुस्लिम मंत्र्याला आठवल हिंदू – मुस्लिम भाईचारा!!

    Sonam Wangchuk : सोनम वांगचुक यांच्या उपोषणावर दिल्ली हायकोर्टात तातडीची सुनावणी; केंद्र-दिल्ली सरकारकडून उत्तर मागितले