विशेष प्रतिनिधी
वाराणसी : मोहम्मद अली जिना ज्या लोकांसाठी महापुरुष आहेत, त्यांनी तत्काळ देश सोडून निघून जावे, असे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे वरिष्ठ प्रचारक इंद्रेश कुमार यांनी म्हटले आहे.काशी विद्यापीठाच्या ललित कला विभागाच्या एका कार्यक्रमाला इंद्रेश कुमार यांनी उपस्थिती लावली. त्यावेळी ते बोलत होते.Those should leave country who thinj Jinna narional leader
ते म्हणाले, मोहम्मद अली जिना ज्यांना महापुरुष वाटतात, त्यांनी तातडीने देश सोडावा. भारत आणि भारतीयांवर ओझे होऊन उगाचच येथे राहू नये. जिनाप्रेमी लोकांनी तत्काळ भारत सोडला तरी चालेल. दुसऱ्यांना चुकीचे सिद्ध करण्यासाठी निराधार आरोप करणे किंवा दावे करणे चुकीचे आहे.
बनारस हिंदू विश्वविद्यापीठाच्या अंतरात्म्यात महामना मालवीय आहेत. त्यांची जागा कुणीही घेऊ शकत नाही, असे इंद्रेश कुमार यांनी मालवीय यांचा फोटो हटवून अल्लामा इकबाल यांचा लावल्याप्रकरणावर प्रतिक्रिया देताना सांगितले. सारे जहां से अच्छा गीत लिहिणार इकबाल पाकिस्तानात गेले, तेव्हा त्यांना या गीताचा अर्थ समजला नाही का, अशी टीकाही त्यांनी केली.
समाजवादी पक्षाचे राष्टीय अध्यक्ष अखिलेश यादव यांनी एका सभेत मोहम्मद अली जिना यांच्याबाबत केलेल्या विधानामुळे वाद झाला होता. जिना यांना देशाचे पंतप्रधान केले असते तर फाळणी टळली असती असे ते म्हणाले होते.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App