भाजपमध्ये जाण्याची “चूक” करणाऱ्या आदिवासी महिलांना ममतांच्या तृणमूल काँग्रेसची “ही” सजा!!

प्रतिनिधी

नवी दिल्ली : बडे बडे नेते आपापल्या राजकीय सोयीने पक्षांतर करत असताना त्यांचे स्वागत मोठमोठे पक्ष धुमधडाक्यात करतात, पण हाच पक्षांतराचा प्रयत्न किंवा कुठल्याही पक्षाशी संलग्न होण्याचा प्रयत्न सर्वसामान्यांनी केला तर काय होते?, याची चुणूक ममता बॅनर्जींच्या पश्चिम बंगाल मध्ये आली आहे. These Tribal women doing Dandavat Parikrama are residents of Balurghat

ममता बॅनर्जींच्या तृणमूळ काँग्रेसच्या एका स्थानिक नेत्याने आदिवासी महिलांना त्यांनी केवळ भाजपमध्ये प्रवेश केला म्हणून साष्टांग दंडवत प्रदक्षिणा घालण्याची शिक्षा दिली आहे. या शिक्षेचा व्हिडिओ व्हायरल झाला असून त्यावर नागरिक प्रचंड संतापही व्यक्त करत आहेत. मार्टिना किसकू, शिवली मारडी, थकरन सोरेन आणि मालती मुर्मू या चार महिला बेलूर घाटच्या रहिवासी आहेत. त्यांनी केवळ भाजपमध्ये प्रवेश केला म्हणून तृणमूळ काँग्रेसच्या स्थानिक नेत्याने या चौघींना बेलूर घाटाची दंडवत परिक्रमा घालण्याची शिक्षा सुनावली आहे.

https://youtube.com/shorts/AteaIxuKpBg?feature=share

सर्वसामान्यपणे दंडवत परिक्रमा हा धार्मिक नवसाचा विधी आहे, तो अनेक मठ मंदिरांमध्ये सर्वसामान्य नागरिक करत असतात. पण ममतांच्या पश्चिम बंगाल मध्ये मात्र भाजपला धार्मिक कट्टरवादी लेबल लावत तृणमूळ काँग्रेसच्या स्थानिक नेत्यांनी आदिवासी महिलांना ही दंडवत परिक्रमा करण्याची सजा फर्मावली आहे.

These Tribal women doing Dandavat Parikrama are residents of Balurghat

महत्वाच्या बातम्या 

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात