• Download App
    पंतप्रधानांनी चांगल्या भावनेने केले राजस्थानच्या मुख्यमंत्र्यांचे कौतुक पण कॉँग्रेसच्या पोटात आला गोळा!|The Prime Minister praised the Chief Minister of Rajasthan in a good mood but the Congress got fed up!

    पंतप्रधानांनी चांगल्या भावनेने केले राजस्थानच्या मुख्यमंत्र्यांचे कौतुक पण कॉँग्रेसच्या पोटात आला गोळा!

    विशेष प्रतिनिधी

    नवी दिल्ली : राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत माझ्याशी खुल्या मनाने बोलले. ही मैत्री आणि विश्वासच हा लोकशाहीचा सर्वात मोठा विजय आहे, अशा शब्दांत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गेहलोत यांचे कौतुक केले. मात्र, त्यामुळे कॉँग्रेसच्या पोटात गोळा आला आहे.The Prime Minister praised the Chief Minister of Rajasthan in a good mood but the Congress got fed up!

    राजस्थानमध्ये ४ वैद्यकीय महाविद्यालयांच्या पायाभरणीच्या व्हर्च्युअल समारंभात पंतप्रधान मोदी बोलत होते. यावेळी मोदी यांनी मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांचे आभार मानत कौतुक केले. पंतप्रधान म्हणाले, मुख्यमंत्री गहलोत यांनी राज्यासाठीच्या विकासकामांची यादीच माझ्यासमोर ठेवली आहे.



    यामधून हे स्पष्ट दिसून येतं की, वेगवेगळ्या राजकीय विचारधारा असूनही त्यांचा माझ्यावर विश्वास आहे. यासाठी मी अशोक गेहलोत यांचे आभार मानतो. मुख्यमंत्री गहलोत हे माझ्याशी खुल्या मनाने बोलले. कारण त्यांचा माझ्यावर विश्वास आहे. ही मैत्री आणि विश्वासच हा लोकशाहीचा सर्वात मोठा विजय आहे.

    करोना महामारीने जगभरातील आरोग्य क्षेत्राबद्दल बरंच काही शिकवलं आहे. अशा परिस्थितीत प्रत्येक देश आपापल्यापरीने या संकटाला समोरे जात आहे. भारताने या काळात आपली शक्ती वाढवण्याचा आणि आत्मनिर्भर होण्याचा संकल्प केला आहे. राजस्थानमध्ये चार नवीन वैद्यकीय महाविद्यालयांचं बांधकाम सुरू होणं आणि जयपूरमध्ये पेट्रोकेमिकल्स संस्थेचं उद्घाटन होणं ही याच दिशेने उचललेली महत्त्वाची पावले असल्याचेही मोदी यांनी सांगितले.

    पंतप्रधानांनी विकासाच्या मुद्यावर गेहलोत यांचे कौतुक केले असले तरी त्यामुळे कॉँग्रेसच्या नेत्यांमध्य चलबिचल सुरू झाली आहे. यापूर्वी कॉँग्रेसचे नेते सचिन पायलट नाराज झाल्यामुळे भाजपच्या संपर्कात असल्याची चर्चा सुरू झाली होती.

    कॉँग्रेसने पंजाबमध्ये कॅ. अमरिंदरसिंग यांच्यासारख्या ज्येष्ठ नेत्याला अपमानास्पद पध्दतीने मुख्यमंत्रीपदावरून दूर केले. राजस्थानातही कॉँग्रेस हे करण्याची शक्यता व्यक्त होत आहे. मात्र, खुद्द पंतप्रधानांनीच मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांचे कौतुक केल्याने कॉँग्रेसच्या नेत्यांच्या पोटात गोळा आला आहे.

    The Prime Minister praised the Chief Minister of Rajasthan in a good mood but the Congress got fed up!

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    PM Dhan-Dhanya Krishi Yojana : केंद्राची पंतप्रधान धन-धान्य कृषी योजनेला मंजुरी; कमी कृषी उत्पादन असलेल्या 100 जिल्ह्यांवर लक्ष; 1.7 कोटी शेतकऱ्यांना फायदा

    RBI Governor : सरकार व्याजदरात आणखी कपात करू शकते; RBI गव्हर्नर म्हणाले- GDP डेटामध्ये मंदी असल्यास कमी केले जाऊ शकतात व्याजदर

    CDS Anil Chauhan : सीडीएस म्हणाले- कालच्या शस्त्रांनी तुम्ही आजचे युद्ध जिंकू शकत नाही; सुरक्षेसाठी गुंतवणूक गरजेची