कबूतर पकडण्याच्या नादात सीमा ओलांडून आला, पण पाकिस्तान सरकारने १४ वर्षांचा मुलगा सोडून दिला

विशेष प्रतिनिधी

चंडीगढ : पाकव्याप्त काश्मीरमधील टाट्रिनाट गावातील असमद हा चौदा वर्षे वयाचा काश्मीरी मुलगा त्याच्या कबुतराला पकडण्याच्या नादात तीन महिन्यांपूर्वी भारतीय हद्दीत आला. मात्र, पाकिस्तान सरकारने त्याला सोडून दिले आहे. भारताने त्याला सध्या अमृतसर येथे ठेवले आहे. असमद हा चुकून सीमा ओलांडून आल असे पत्र पाकिस्तान सरकारने भारत सरकारला लिहिले तर त्याची सुटका आहे.The pigeon crossed the border to catch it he came to Indian border, but the Pakistani government has no worry about 14-year-old boy

मात्र, पाकिस्तान सरकार त्याची दखल घेण्यास तयार नाही.सीमा सुरक्षा दलानेअसमदला पकडून पोलिसांच्या हवाली केले. आता त्याला पूंछमधील केंद्रीय सुधार तुरुंगातून अमृतसरला आणण्यात आलेआहे.असमदला कबूतर पाळण्याचा नाद आहे. टाट्रिनोट गावात असमद त्याच्या आजी-आजोबांकडे राहतो.



त्याच्या आईचे निधन झालेले आहे, तर वडिलांनी दुसरे लग्न केले. असमदच्या सुटकेसाठी प्रयत्न करीत असलेले मानवाधिकार कार्यकर्ता राहुल कपूर यांनी असमदच्या आजी-आजोबांशी बोलून माहिती गोळा केली आहे. नंतर त्यांनी पाकिस्तानी दूतावासाशी संपर्क साधला.

पाकिस्तानी अधिकाºयांनी अमृतसर तुरुंगात असमदला अनेक प्रश्न विचारले. त्याच्या आजी-आजोबांशीही बोलणार आहेत. आजी-आजोबा आणि असमदच्या उत्तरांत साम्य असेल, तर त्याच्या सुटकेची प्रक्रिया सुरू होईल.

The pigeon crossed the border to catch it he came to Indian border, but the Pakistani government has no worry about 14-year-old boy

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात