विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : मोदींविरोधात आंधळ्या झालेल्यांची असंवेदनशिलता पुन्हा एकदा दिसून आली आहे. चिफ ऑफ डिफेन्स स्टाफ जनरल बिपिन रावत यांच्या मृत्यूनंतर काँग्रेसचे मुखपत्र नॅशनल हेराल्डच्या संपादक अॅश्लिन मॅथ्यू यांनी दैवी हस्तक्षेप असे ट्विट केले. मात्र, याबाबत संताप व्यक्त झाल्यावर हे ट्विट हटवून आपल्या ट्विटचा जनरल रावत यांच्या अपघाताशी काहीही संबंध नसल्याचे म्हटले अहे.The insensitivity of the National Herald editor, who is the mouthpiece of the Congress, tweeted that it was a divine intervention in the death of General Rawat.
मात्र, हे ट्विट डिलिट करण्यापूर्वी ट्विटचा स्क्रीनशॉट सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर व्हायरल होऊ लागला. नेटकºयांनी मॅथ्यू यांच्या असंवेदनशिलतेबद्दल संताप व्यक्त केला आहे. गीता एस कपूर यांनी म्हटले आहे की, अॅश्लिन मॅथ्यू हेलिकॉप्टर अपघाताचा आनंद व्यक्त करत आहे. त्या नॅशनल हेराल्डची पत्रकार आहेत.
समीत ठक्कर यांनी म्हटले आहे की, मॅथ्यू या गांधी मायनो परिवाराद्वारे चालवल्या जाणाऱ्या नॅशनल हेराल्ड वृत्तपत्राच्या पत्रकार आहेत. एका यूजरने म्हटले आहे की, ख्रिस्ती सोनिया गांधी आणि राहूल गांधी यांच्या मालकीच्या नॅशनल हेराल्डसाठी काम करतात हे विसरू नका.
ट्विटर युजर अरुंधती राठी म्हणाल्या, तुम्ही पाहिजे तेवढा खुलासा करा पण एकदा शब्द निघाले की मागे घेता येत नाहीत. ते तुमचा खरा हेतू दर्शवतात. भारत आणि पाकिस्तानमधील सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर इस्लामी लोकही या बातमीचा आनंद घेत आहेत.
मॅथ्यू यांनी खुलासा करताना म्हटले आहे की, माझ्या ट्विटबद्दल एक मोहीम सुरू झाली आहे. त्याचा सध्याच्या शोकांतिकेशी काहीही संबंध नव्हता. तरीही, कोणाच्याही भावना दुखावल्या गेल्या असतील तर मला खेद वाटतो.मात्र, त्यांचे हे स्पष्टीकरणही नेटकºयांना पटलेले नाही. ट्विटचा सध्याच्या दुर्घटनेशी काही संबंध नाही तर मग ते ट्विट तुम्ही डिलिट का केले?
The insensitivity of the National Herald editor, who is the mouthpiece of the Congress, tweeted that it was a divine intervention in the death of General Rawat.
महत्त्वाच्या बातम्या
- नाही जाणार सलमान खान कॅटरिना विकीच्या लग्नासाठी! आमंत्रण मिळाले नसल्याचा सलमान खानची बहीण अर्पिताने केला खुलासा
- रितेश जेनेलिया यांची जोडी दिसणार नव्या चित्रपटात! रितेश देशमुखचे दिग्दर्शन क्षेत्रात पदार्पण
- CDS Bipin Rawat Death : बिपिन रावत आणि त्यांच्या पत्नीचे पार्थिव उद्या आणणार दिल्लीत, लष्कर प्रमुखांनीही व्यक्त केला शोक