काश्मीरच्या पहलगाम मध्ये दहशतवादी हल्ला; पर्यटकांवर गोळीबार; पंतप्रधान मोदींनी सौदी अरेबियातून अमित शाहांना दिल्या कठोर कारवाईच्या सूचना!!

विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली : जम्मू-काश्मीरच्या पहलगाम मध्ये दहशतवाद्यांनी आज हल्ला केला पर्यटकांवर गोळीबार करून त्यांनी काही लोकांना जखमी केले. या संदर्भातली तपशीलवार माहिती अद्याप हाती यायची असून पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मात्र सौदी अरेबियातून या हल्ल्याची दखल घेत केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना फोनवरून दहशतवाद्यांच्या विरोधात कठोर कारवाई करण्याच्या सूचना दिल्या.Terrorist attack in Kashmir’s Pahalgam; Tourists shot; PM Modi instructs Amit Shah to take strict action from Saudi Arabia!!

जम्मू काश्मीरमध्ये बऱ्याच दिवसांनी दहशतवाद्यांनी डोके वर काढले. अमरनाथ यात्रा सुरू होण्यापूर्वी त्यांनी पहेलगाम मधल्या बैसरन घाटीत पर्यटकांवर बेछूट गोळीबार केला. या गोळीबारामध्ये 12 पर्यटक जखमी झाल्याची माहिती आहे. दहशतवाद्यांनी आम्हाला धर्म विचारला आणि आमच्यावर गोळीबार केला, असे पर्यटक महिलेने पोलिसांना सांगितले. गोळीबाराचा आवाज ऐकताच सुरक्षा दलाने ताबडतोब हालचाली करून पर्यटकांना सुरक्षित स्थानी नेले आणि सर्च ऑपरेशन सुरू केले. ते सर्च ऑपरेशन अद्यापही सुरू असून लष्कराने त्या परिसरात तैनाती वाढवली आहे.



मात्र बऱ्याच दिवसानंतर झालेल्या या दहशतवादी हल्ल्याची दखल सौदी अरेबियाच्या दौऱ्यावर गेलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गांभीर्याने घेतली त्यांनी तिथून केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना फोन केला. प्रत्यक्ष घटनास्थळी जायच्या सूचना दिल्या. त्याचबरोबर दहशतवाद्यांच्या विरोधात कठोर कारवाई करायचा निर्धार देखील पंतप्रधानांनी व्यक्त केला.

Terrorist attack in Kashmir’s Pahalgam; Tourists shot; PM Modi instructs Amit Shah to take strict action from Saudi Arabia!!

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात