दुकानात वाहनातून फटाक्यांचे बॉक्स उतरवत असताना आग लागली
विशेष प्रतिनिधी
बंगळुरू: कर्नाटकची राजधानी बंगळुरूमध्ये आज म्हणजेच शनिवारी संध्याकाळी एक भीषण अपघात घडला, त्यानंतर सर्वत्र हाहाकार माजला. खरं तर, बेंगळुरूच्या बाहेरील अटीबेले येथे एका फटाक्यांच्या दुकानात भीषण आग लागली, ज्यात १० जणांचा होरपळून मृत्यू झाला. ही आग इतकी भीषण होती की फटाक्यांच्या स्फोटाचा आवाज दूरपर्यंत ऐकू येत होता. Terrible accident in Bangalore 10 people died in firecracker shop fire
प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार, बालाजी क्रॅकर्सच्या दुकानात वाहनातून फटाक्यांचे बॉक्स उतरवत असताना आग लागली. यानंतर दुकान आणि गोदाम आगीत जळून खाक केले. अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी पोहोचून आगीवर नियंत्रण मिळवण्याचे काम सुरू तातडीने सुरू केले.
मात्र, बचाव कर्मचारी घटनास्थळी पोहोचेपर्यंत आगीत १० जणांचा मृत्यू झाला होता. घटनास्थळावरून आतापर्यंत १० मृतदेह बाहेर काढण्यात आले असून आणखी काही लोक आगीत अडकल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. सध्या मदत आणि बचावकार्य सुरू आहे.
Terrible accident in Bangalore 10 people died in firecracker shop fire
महत्वाच्या बातम्या
- राघव चढ्ढा यांना न्यायालयाकडून झटका,”सरकारी घरावर ताबा ठेवण्याचा अधिकार नाही”
- Rajasthan : नितीश – लालूंच्या पावलावर अशोक गेहलोतांचे पाऊल; राजस्थानातही बिहारसारखे जातनिहाय सर्वेक्षण!!
- Asian Games : भारतीय हॉकी संघाने सुवर्णपदक जिंकल्यावर मोदींनी दिली खास प्रतिक्रिया, म्हणाले…
- देवरिया हत्याकांड प्रकरणी आणखी २३ अधिकाऱ्यांवर कारवाई; मुख्यमंत्री योगींची कडक कारवाई