इराणच्याच चिथावणीतून पॅलेस्टिनी दहशतवादी संघटना हमासने इस्रायलवर हल्ला केला. पण त्याला तितकेच किंबहुना अधिक प्रखर प्रत्युत्तर मिळाल्याने हमासची पीछेहाट झाली. हमासच्या हल्ल्यात 100 इस्रायली नागरिक ठार झाल्याच्या बातम्या समोर आल्या, पण त्याच वेळी हमासचे 200 दहशतवादी इस्रायली हवाई हल्ल्यात मारले, याही बातम्या पुढे आल्या. Iran instigated hammas to strike on Israel, understand the geo politics!!
पण मूळात हमासने हा हल्ला केलाच का??, याचे तपशील थोडे समजून घेतले तर काही खुलासे होतील.
यासाठी पश्चिम आशियातले geo politics समजून घेणे आवश्यक आहे.
पश्चिम आशियात सर्वांत श्रीमंत देश सौदी अरेबियाला सर्वांत मोठा धोका इराणचा आहे. इराण मोठ्या प्रमाणावर विनाशकारी अण्वस्त्रे बाळगण्याच्या उंबरठ्यावर असताना ते मिळविण्यात सौदीचा मोठा अडसर आहे, पण त्याच वेळी सौदी अरेबियाला इराणचा सामना करण्यासाठी स्वतःचा बॉम्ब हवा आहे आणि अमेरिकेच्या मंजुरीशिवाय ते शक्य नाही.
सौदी अरेबियाला बॉम्ब निर्मितीस मदत करण्यासाठी अमेरिकेने ज्या अटी शर्ती घातल्यात, त्यामध्ये प्रमुख अट म्हणजे इस्रायलशी शांतता करार आणि तेलाच्या किमतींबाबत तेल उत्पादक संघटना अर्थात ओपेकचे अमेरिकेला सहकार्य या आहेत.
अमेरिकेच्या अटी मान्य करताना सौदी अरेबियाला इस्रायलशी संबंध सुधारण्यात कोणतीही अडचण नाही, त्यामुळे सौदी अरेबिया इस्रायलशी अर्थपूर्ण शांतता करार करायलाही तयार आहे.
सौदी अरेबिया आणि इस्रायल यांच्यातल्या शांतता कराराचा मसूदा जवळपास पूर्णही झाला आहे. काही औपचारिकता बाकी आहेत.
आणि इथेच पश्चिम आशियातल्या geo politics ची खरी मेख दडली आहे.
सौदी अरेबियाने इस्रायलशी शांतता करारावर स्वाक्षरी केल्यास, पॅलेस्टिन आणि इराण “बेरोजगार” होतील. म्हणजे त्यांचे पश्चिम आशियातल्या geo politics मधले महत्त्व कमी होईल. तेल उत्पादक देश म्हणजे ओपेक संघटनेतले निर्णायक बळ संपुष्टात येईल. याचा परिणाम म्हणून त्यांच्या राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय इस्लामी राजकारणाला अटकाव तयार होईल.
त्यामुळेच इराणने सर्व प्रकारची मदत देऊन पॅलेस्टिनी हमास दहशतवादी संघटनेला ऍक्टिव्हेट केले आणि हमासने आज इस्रायलवर हल्ला केला आहे.
इस्त्रायलकडून जोरदार प्रत्युत्तर मिळताच मुस्लिम ब्रदरहूडच्या नावाखाली बाकी सर्व इस्लामी देशांना चिथावणी देऊन सौदी अरेबिया – इस्रायल करार हाणून पाडणे हे इराणचे उद्दिष्ट आहे.
एकदा इस्रायलने प्रत्युत्तर दिले आणि पॅलेस्टाईनमधली मृतांची संख्या वाढली की, मीडियाच्या मदतीने “मुस्लिमांच्या नरसंहार”चा नॅरेटिव्ह तयार करून इस्रायल आणि सौदी यांच्यातील संभाव्य शांतता करार मोडीत काढला जाऊ शकतो, असा इराणचा होरा आहे.
पण प्रत्यक्षात…
पश्चिम आशियात मुस्लिम जगाला शांतता हवी असेल, तर सौदी अरेबिया – इस्रायल करार आवश्यक आहे. सौदी विरुद्ध हमासमध्ये केवळ मुस्लिम देशच नव्हे, तर भारतासह जगभरातील तथाकथित उदारमतवादी, शांतताप्रिय मुस्लिम काय भूमिका घेतात??, याला विशेष महत्त्व येणार आहे. इराणी चिथावणीला ते बळी पडले, तर इस्रायलकडून ते मार खातीलच, पण भारतही त्यांना सोडणार नाही.
भारतात लिबरल्स आणि इस्लामी कट्टरपंथी यांच्या युतीतून कोणी उत्पात घडविण्याचा प्रयत्न केला, तर तो आता कठोरपणे मोडून काढला जाईल.
याच दृष्टिकोनातून हमास विरुद्ध इस्रायल या संघर्षात भारत ठामपणे इस्रायलच्या बाजूने उभा राहिला आहे. त्याचबरोबर सौदी – इस्रायल शांतता कराराला देखील भारताचा ठाम पाठिंबा आहे. कारण या करारातून पश्चिम आशियातल्या geo politics मध्ये इराण पॅलेस्टाईन सह इस्लामी देशांचे महत्त्व घटेल, तेव्हाच भारताचा तिथल्या geo politics मधला वाटा वाढणार आहे.
भारतात झालेल्या नुकत्याच झालेल्या g 20 परिषदेत तीन स्ट्रॅटेजिक करारांमध्ये सौदी अरेबियाला भारताने जोडून घेतले आहे, याचेही या नव्या संदर्भात विशेष महत्त्व आहे.
Iran instigated hammas to strike on Israel, understand the geo politics!!.
महत्वाच्या बातम्या
- राघव चढ्ढा यांना न्यायालयाकडून झटका,”सरकारी घरावर ताबा ठेवण्याचा अधिकार नाही”
- Rajasthan : नितीश – लालूंच्या पावलावर अशोक गेहलोतांचे पाऊल; राजस्थानातही बिहारसारखे जातनिहाय सर्वेक्षण!!
- Asian Games : भारतीय हॉकी संघाने सुवर्णपदक जिंकल्यावर मोदींनी दिली खास प्रतिक्रिया, म्हणाले…
- देवरिया हत्याकांड प्रकरणी आणखी २३ अधिकाऱ्यांवर कारवाई; मुख्यमंत्री योगींची कडक कारवाई