ऑस्ट्रेलियन उर्मटपणा : टीम इंडियाला ऑस्ट्रेलियात खराब वागणूक; प्रॅक्टिस सेशन 42 किलोमीटर दूर, खायला दिली सँडविच

वृत्तसंस्था

सिडनी : ऑस्ट्रेलियन क्रिकेट टीमचा टिपिकल उर्मटपणा सगळ्यांना माहितीच आहे. क्रिकेट मैदानात ऑस्ट्रेलियाचे खेळाडू स्लेजिंग करून प्रतिस्पर्धी टीमचे मनोधैर्य खच्ची करण्याचा प्रयत्न करतात त्यामुळे टीम ऑस्ट्रेलिया आधीच बदनाम आहेत. पण आता त्या पुढे जाऊन ऑस्ट्रेलियातले वर्ल्ड कप आयोजित करणारे यजमान देखील तितकेच उर्मट आहेत हे स्पष्ट झाले आहे. Team India did not do practice sessions as it was offered a practice venue in Blacktown

टीम इंडियाला ऑस्ट्रेलियात अतिशय खराब वागणूक मिळाली आहे. टीम इंडियाचे प्रॅक्टिस सेशन त्यांना उतरवण्यात आलेल्या हॉटेलपासून 42 किलोमीटर लांब ठेवले. टीम इंडियाचे प्रॅक्टिस सेशन सिडनी मधील हॉटेल पासून पासून 42 किलोमीटर दूर ब्लॅक टाऊन मध्ये ठेवले होते, इतकेच नाहीतर प्रॅक्टिस सेशननंतर खेळाडूंना खाण्यासाठी फक्त सँडविच देण्यात आले. त्यांना दिलेले बाकीचे अन्नपदार्थ देखील थंड आणि खराब होते. अतिथी देवो भव म्हणून पाहुण्यांची सरबराई करणे तर दूरच पण गरम अन्नपदार्थ वाढण्याचे साधे सौजन्य देखील ऑस्ट्रेलियन क्रिकेट व्यवस्थापनाने दाखवले नाही. बीसीसीआयच्या सूत्रांनी ही माहिती दिली आहे इतकेच नाही तर या टीम इंडियाला ऑस्ट्रेलियात मिळालेल्या खराब वर्तणुकीबद्दल आयसीसी कडे तक्रार देखील केली आहे.

 

टीम इंडियाला मिळालेल्या वर्तणुकीचे सोशल मीडिया देखील पडसाद म्हटले असून अनेकांनी ऑस्ट्रेलियाची इज्जत काढली आहे वर्ल्ड कप भरवण्याची ऐपत नव्हती, तर तो भरवलाच कशाला?? पाहुण्यांना साधे खायला नीट देता येत नाही, तर वर्ल्ड कप सारखे मोठे इव्हेंट आयोजित करतातच कशाला?? असे सवाल सोशल मीडियावर अनेकांनी केले आहेत. अनेकांनी ऑस्ट्रेलियाच्या उर्मटपणावर निशाणा साधला आहे.

Team India did not do practice sessions as it was offered a practice venue in Blacktown

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात