विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : फार पूर्वी एक मराठी गीत होते, दिवस उद्याचा सवडीचा रविवार माझ्या आवडीचा…!! त्याच धर्तीवर आजच्या रविवारचे वर्णन करता येईल. मोसम आला निवडणुकीचा, रविवार ठरला गॅरेंटीचा!! असे म्हणता येईल. कारण भारतातल्या दोन प्रमुख पक्षाच्या दोन सर्वोच्च नेत्यांनी आज वेगवेगळ्या ठिकाणी लोकांना गॅरेंटी दिल्या. Sunday proved to be a guarantee day of BJP and Congress
मोदी गॅरेंटी
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नवी दिल्लीतील विश्वकर्मा जयंती निमित्त विविध पारंपारिक कलावंत आणि व्यवसायिकांसाठी मोठ्या घोषणा करताना स्वतःच्या नावाची गॅरेंटी दिली. जिथे बँका कर्ज देण्यासाठी तुम्हाला गॅरंटी देत नाहीत, तिथे मोदी गॅरेंटी देतो, असे ते म्हणाले. या मोदी गॅरेंटीवर पारंपरिक कलावंत आणि व्यवसायिकांना व्यवसायासाठी 300000 रुपयांपर्यंत अल्प व्याजदरात कर्ज उपलब्ध होणार आहे. त्यासाठी केंद्र सरकारने 16000 कोटी रुपयांची सुरुवातीची तरतूद केली आहे. यातून पारंपारिक व्यवसाय करणारे सोनार, सुतार, लोहार, कुंभार तसेच विणकर, पारंपारिक खेळणी बनवणारे कलाकार आदी व्यावसायिकांना मोठा लाभ होणार आहे.
तेलंगणात काँग्रेसच्या 6 गॅरेंटी
गॅरेंटीचा दुसरा शब्द तेलंगणामधून आला. हैदराबाद मध्ये काँग्रेस कार्यकारिणीची बैठक पार पडल्यानंतर तेलंगण विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराचा काँग्रेसने नारळ फोडला आणि त्यामध्ये मुख्य भाषण काँग्रेस संसदीय दलाच्या नेत्या सोनिया गांधींचे झाले. या भाषणात सोनिया गांधींनी तेलंगणवासीयांसाठी काँग्रेसकडून 6 गॅरेंटी दिल्या. यामध्ये महिलांसाठी महालक्ष्मी योजना यात तेलंगणा मधील प्रत्येक महिलेला दरमहा 2500 रुपये, 500 रुपयांमध्ये स्वयंपाकाचा गॅस यांच्यासह युवक, दलित, मुस्लिम, दिव्यांग जनांसाठी वेगवेगळ्या गॅरंटी जाहीर केल्या.
कर्नाटक विधानसभा निवडणुकीच्या वेळी काँग्रेसने 5 गॅरेंटी दिल्या होत्या. त्यामुळे निवडणुकीत त्यांना यश आले. पण त्या गॅरेंटी पूर्ण करताना आज कर्नाटक काँग्रेस सरकारची दमछाक होते आहे. ते वारंवार केंद्र सरकारकडे हात पसरत आहेत, पण तरीदेखील काँग्रेसने कर्नाटकातल्या 5 गॅरेंटींमध्ये आणखी एका गॅरंटीची भर घालून तेलंगणात 6 गॅरेंटी त्यांनी जाहीर केल्या.
अर्थातच राजधानी नवी दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आणि हैदराबाद मध्ये सोनिया गांधी यांनी म्हणजेच भाजप आणि काँग्रेस या दोन बड्या पक्षाच्या सर्वोच्च नेत्यांनी जनतेसाठी गॅरंटीचे महादरवाजे उघडले. आता या महादरवाज्यातून कोणाला राजकीय यशोभूमी दिसणार??, हे जनताच ठरवणार आहे.
Sunday proved to be a guarantee day of BJP and Congress
महत्वाच्या बातम्या
- Asia cup : गणपती बाप्पा मोरया, लंकेचा वाजला बोऱ्या; आशिया चषकात भारताचा अष्टकार!!
- अमृता शेरगिलच्या पेंटिंगचा 61.8 कोटींना लिलाव; रझांचे रेकॉर्ड तोडले!!
- संसदेच्या नवीन इमारतीत प्रथमच राष्ट्रध्वज फडकला, उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी फडकवला तिरंगा
- पंतप्रधान मोदींनी जन्मदिनी देशाला दिली ‘यशोभूमी कन्वेशन सेंटर’ आणि विश्वकर्मा योजनेची भेट!