वृत्तसंस्था
नवी दिल्ली : देशात खळबळ माजवणाऱ्या नॅशनल हेराल्ड मनी लॉन्ड्रिंग घोटाळ्यात काँग्रेसच्या हंगामी अध्यक्ष सोनिया गांधी आणि वायनाडचे खासदार राहुल गांधी यांना सक्तवसुली संचालनालय अर्थात ईडीने चौकशी आणि तपासासाठी 8 जून रोजी हजर राहण्याचे समन्स पाठविले आहे. Summons of Sonia Gandhi, Rahul Gandhi ED in National Herald money laundering scam
काँग्रेसच्या नेत्यांनी या विरोधात प्रचंड आगपाखड केली असून केंद्रातले मोदी सरकार फॅसिस्ट आणि हुकूमशाहीवादी असल्याचा आरोप काँग्रेसचे प्रवक्ते रणदीप सुरजेवाला यांनी केला आहे. पण त्याचबरोबर सोनिया गांधी आणि राहुल गांधी ईडी कार्यालयात चौकशीसाठी हजर राहतील, असे त्यांनी स्पष्ट केले आहे.
याआधी या केसमध्ये माजी केंद्रीय मंत्री काँग्रेसचे नेते पवन कुमार बंसल आणि राज्यसभेतील काँग्रेसचे नेते मल्लिकार्जुन खर्गे यांची चौकशी ईडीने केली आहे.
सुब्रमण्यम स्वामींनी केली केस
- हीच ती नॅशनल हेराल्ड केस आहे, ज्यामध्ये सन 2012 मध्ये भाजपचे वरिष्ठ नेते खासदार सुब्रमण्यम स्वामी यांनी सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांच्यावर 55 कोटी रुपयांचा मनी लॉन्ड्रिंग घोटाळा केल्याचा आरोप करत कोर्टात केस दाखल केली आहे.
- नॅशनल हेराल्ड केस गेल्या 7 – 8 वर्षांपासून सुरू आहे. यापूर्वी अनेकांची चौकशी केली आहे. परंतु ईडीच्या हाती काही लागलेले नाही. सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांच्यावर केवळ राजकीय हेतूने आरोप केले आहेत. यामध्ये राजकीय सुडाची देखील भावना आहे, असा आरोप वरिष्ठ वकील अभिषेक मनु सिंघवी यांनी केला आहे.
- केवळ कंपनी मजबूत करण्यासाठी आणि कर्जमुक्त होण्यासाठी कंपनीच्या इक्विटी मध्ये बदल केला आहे. इक्विटी मधून जो पैसा आला तो कामगारांना वाटण्यात आला आणि त्यामध्ये पूर्ण पारदर्शकता होती, असा दावाही अभिषेक मनु सिंघवी यांनी केला आहे.
- आता 7 वर्षांनंतर जनतेचे ध्यान महत्त्वाच्या प्रश्नांवरून हटवण्यासाठी ईडी, सीबीआय यांच्यासारख्या केंद्रीय तपास संस्थांचा गैरवापर केंद्र सरकार करते आहे. विरोधी पक्षाच्या नेत्यांना जुन्या केसेस मध्ये अडकवून त्यांना भीती घालण्याचा प्रयत्न होतो आहे, असाही आरोप सिंघवी यांनी केला आहे.
- सुब्रमण्यम स्वामी यांचे आरोप
- काँग्रेसने पार्टी फंडातून सोनिया आणि राहुल गांधी यांना 90 कोटी रुपये दिले. एसोसिएट जर्नल्सची 2000 कोटी रुपयांची संपत्ती हडप करण्याचा हा डाव होता. यासाठी गांधी परिवाराने फक्त 50 लाख रुपये एवढी मामुली रक्कम दिली होती, असा सुब्रमण्यम स्वामी यांचा दावा आहे.
- केस नेमकी आहे काय?
- 1938 मध्ये काँग्रेस पार्टीने एसोसिएट जर्नल्स लिमिटेड (AJL) ही कंपनी बनवली आहे. ही कंपनीच नॅशनल हेराल्ड वर्तमानपत्र प्रकाशित करते या कंपनीवर 90 कोटी रुपयांहून अधिक कर्ज होते कर्ज फेडण्यासाठी एक दुसरी कंपनी बनवली गेली तिचे नाव एन इंडिया लिमिटेड ठेवण्यात आले.
- यंग इंडिया कंपनीत राहुल गांधी आणि सोनिया गांधी यांची हिस्सेदारी प्रत्येकी 38 % टक्के होती. यंग इंडिया कंपनीला असोसिएट जर्नल्स लिमिटेड कंपनीने 9 कोटी रुपयांचे शेअर दिले. यंग इंडिया कंपनी असोसिएट जर्नल्स लिमिटेडचे कर्ज चुकवेल, असे सांगण्यात आले.
- शेअर मधली हिस्सेदारी वाढल्यामुळे आपोआपच यंग इंडिया कंपनीकडे असोसिएट जर्नल्स लिमिटेडची मालकी आली. आणि कर्ज चुकवण्यासाठी काँग्रेस पक्षाने जे 90 कोटी रुपये कर्ज दिले होते ते नंतर माफ करून टाकण्यात आले.
- नेमक्या याच मुद्द्यावरून सन 2012 मध्ये सुब्रमण्यम स्वामी यांनी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांवर खटले भरले. यामध्ये सोनिया गांधी, राहुल गांधी, मोतीलाल वोरा, ऑस्कर फर्नांडिस सुमन दुबे आणि सॅम पित्रोदा यांना आरोपी करण्यात आले. दरम्यानच्या काळात ऑस्कर फर्नांडिस आणि मोतीलाल वोरा यांचे निधन झाले आहे.
- 26 जून 2014 रोजी मेट्रोपॉलिटन मॅजिस्ट्रेटने राहुल, सोनिया गांधी यांच्या समवेत सर्व आरोपींना समन्स जारी केले होते. त्यावेळी ऑस्कर फर्नांडिस आणि मोतीलाल वोरा हे हयात होते.
- 1 ऑगस्ट 2014 रोजी ईडीने या प्रकरणात मनी लॉन्ड्रिंगची केस दाखल केली. मी 2019 मध्ये या केस संदर्भात सुमारे 64 कोटी रुपयांची संपत्ती ईडीने जप्त केली.
- याआधी 19 डिसेंबर 2015 रोजी सोनिया गांधी राहुल गांधी आणि अन्य आरोपींना दिल्लीतील पतियाळा कोर्टाने जामीन मंजूर केला.
- 9 सप्टेंबर 2018 रोजी दिल्ली हायकोर्टाने सोनिया आणि राहुल गांधी यांना दिल्ली हायकोर्टाने झटका दिला. त्यांनी इन्कम टॅक्स डिपार्टमेंट विरुद्ध लावलेली याचिका हायकोर्टाने खारीज केली. सुप्रीम कोर्टानेही नंतर त्या चौकशीवर शिक्कामोर्तबच केले.
- आता आज 1 मे 2022 रोजी राहुल गांधी आणि सोनिया गांधी यांना नॅशनल हेराल्ड मनी लॉन्ड्रिंग केस संदर्भात चौकशीसाठी 8 जून रोजी हजर राहण्याचे समन्स पाठवले आहे. त्यानुसार हे दोन्ही नेते चौकशीला हजर राहतील, असे काँग्रेसने जाहीर केले आहे.
Summons of Sonia Gandhi, Rahul Gandhi ED in National Herald money laundering scam
महत्वाच्या बातम्या
- द फोकस एक्सप्लेनर : भारताची जीडीपी वाढ अपेक्षेपेक्षा चांगली; जाणून घ्या जीडीपी म्हणजे काय? किती प्रकारचा असतो? जीडीपी मोजतात कसा?
- भूक भागेना : केंद्राकडून मेपर्यंतची 14145 कोटींची जीएसटी भरपाई; तरीही पवार म्हणाले, अजूनही 15000 कोटी बाकी!!
- तिकिटावरून काँग्रेसमध्ये बंडाळीची चिन्हे ;सोनियांचा नाराज गुलाम नबी आझाद यांना फोन; आनंद शर्मा पक्ष सोडणार असल्याची चर्चा