सुकेश चंद्रशेखर करणार केजरीवालांच्या भ्रष्टाचाराची पोलखोल; नव्या पत्रात लिहिले- 15 कोटींसाठी कोडवर्ड वापरला, 700 पानी व्हॉट्सअॅप चॅट पुरावा

प्रतिनिधी

नवी दिल्ली : फसवणुकीच्या प्रकरणात मंडोली तुरुंगात बंद असलेल्या सुकेश चंद्रशेखरने दावा केला आहे की, आता केजरीवालांचा खेळ संपला आहे, ते लवकरच तिहारमध्ये येतील. सुकेशने शुक्रवारी पत्र लिहून ही माहिती दिली आहे. सुकेश म्हणाला की, केजरीवाल यांचे अबकारी घोटाळ्यात सहभागी असलेल्या के. कवितापासून सर्व दारू व्यावसायिकांशी संबंध आहेत.Sukesh Chandrasekhar Letter On Arvind Kejriwal Curruption New Delhi

केजरीवाल यांनी 2020 मध्ये हैदराबाद येथील टीआरएस कार्यालयात 15 कोटी रुपये पाठवण्यास सांगितले होते, ज्यासाठी केजरीवाल यांनी 15 किलो तूप असा कोड वर्ड वापरला आहे. केजरीवाल यांच्यासोबत व्हॉट्सअॅप चॅट्सचे 700 पेज असल्याचा दावा सुकेशने केला आहे.



सुकेश म्हणाला –सर्व भ्रष्टाचार उघड करणार

केजरीवाल यांची सर्व गुंडगिरी आणि भ्रष्टाचार उघड करणार, असे सुकेश म्हणाला. आता केजरीवालांचा खेळ संपला आहे. ते लवकरच तिहार क्लबमध्ये सामील होतील. 2020 मध्ये अरविंद केजरीवाल यांच्यासाठी 75 कोटी रुपयेही तेलंगणा राष्ट्र समिती कार्यालयात पाठवण्यात आले होते.

सुकेशने वकील अनंत मलिक यांच्यामार्फत हे पत्र जारी केले आहे. तो पुढे म्हणतो की, मिस्टर केजरीवाल, मी 2020 शी संबंधित चॅटचा ट्रेलर रिलीज करणार आहे, ज्यामध्ये तुम्ही आणि सत्येंद्र जैन यांनी 15 किलो तूप हा 15 कोटींसाठी कोड वर्ड ठरवला होता, जो मी स्वतः पाठवला आहे. म्हणजेच टीआरएस या राजकीय पक्षाच्या कार्यालयात अबकारी प्रकरणात आरोपी असलेल्या व्यक्तीला तुमच्या वतीने 15 कोटी रुपये देण्यात आले. हा निव्वळ टीझर असल्याचं सुकेश म्हणाला. तो लवकरच या चॅटचा तपशील जाहीर करणार आहे.

Sukesh Chandrasekhar Letter On Arvind Kejriwal Curruption New Delhi

महत्वाच्या बातम्या 

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात