वृत्तसंस्था
पेशावर : पाकिस्तानच्या पेशावर शहरात मशिदीत शुक्रवारी नमाजाच्या वेळी झालेल्या आत्मघातकी हल्ल्यात आणि स्फोटात 30 जण ठार झाले, तर 50 हून अधिक जण जखमी झाल्याची बातमी आहे.Suicide bombing at a mosque in Peshawar on Friday; 30 killed, 50 injured
सुमारे तासाभरापूर्वी आत्मघातकी पथकातील काही दहशतवादी मशिदीत शिरले. प्रार्थनेच्या वेळी त्यांनी मशिदीच्या मुख्य हॉलमध्ये प्रवेश केला आणि सुरुवातीला बेछूट गोळीबार केला. त्यामध्ये अनेक जण जखमी झाले. प्रत्यक्ष प्रार्थनेच्या वेळी आत्मघातकी पथकातील एकाने मोठा स्फोट घडवून आणला.
या आत्मघातकी हल्ल्यातील स्फोटात सुमारे 30 जण ठार झाले आहेत, तर 50 हून अधिक जण जखमी झाले आहेत. एएनआय या वृत्तसंस्थेने या संदर्भातले ट्विट केले आहे. पाकिस्तानची अधिकृत वृत्तसंस्था जिओ देखील यास पोटाला आत्मघातकी हल्ला असल्याचेच म्हटले आहे.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App