हरियाणा पोलिसांना यश, इनेलोचे नेते नफे सिंह राठी खूनप्रकरणी गोव्यातून 2 शूटर्सना अटक

Success to Haryana Police, 2 shooters arrested from Goa in case of murder of INEL leader Nafe Singh Rathi

वृत्तसंस्था

पणजी : इंडियन नॅशनल लोक दल (INLD) हरियाणा युनिटचे अध्यक्ष नफे सिंह राठी यांच्या हत्येप्रकरणी दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेलसोबत संयुक्त कारवाई करून बहादूरगड पोलिसांनी दोन शूटर्सना अटक केली आहे. सौरभ आणि आशिष अशी शूटर्सची नावे आहेत. गोव्यातून दोन्ही शूटर्सना अटक करण्यात आली आहे. हे दोन्ही शूटर कपिल सांगवान टोळीचे गुंड असल्याचे सांगण्यात येत आहे. या दोघांनाही पोलीस गोव्यातून आणत आहेत. Success to Haryana Police, 2 shooters arrested from Goa in case of murder of INEL leader Nafe Singh Rathi

तत्पूर्वी, हरियाणा पोलिसांनी नफे सिंह राठी यांच्या मुलांना फोनवरून धमकी दिल्याप्रकरणी शुक्रवारी राजस्थानमधून एका व्यक्तीला अटक केली होती. आयएनएलडी नेते नफे सिंह राठी यांच्या मुलांनी दावा केला होता की त्यांना धमकीचे फोन आले होते आणि हत्येबद्दल मीडियाशी बोलू नका असा इशारा देण्यात आला होता. INLDच्या हरियाणा युनिटचे अध्यक्ष राठी आणि पक्षाचे कार्यकर्ता जयकिशन यांची रविवारी झज्जरच्या बहादूरगडमध्ये अज्ञात हल्लेखोरांनी त्यांच्या वाहनावर अंदाधुंद गोळीबार करून हत्या केली.


हरियाणात INLD प्रदेशाध्यक्ष नाफे सिंग राठी यांची हत्या; 3 बंदूकधारी जखमी; लॉरेन्स गँगवर संशय


हरियाणाचे गृहमंत्री अनिल विज यांनी सोमवारी सांगितले की, INLD च्या राज्य युनिट प्रमुखाच्या हत्येचा तपास केंद्रीय अन्वेषण ब्युरो (CBI) कडे सोपविला जाईल. ज्येष्ठ INLD नेते अभयसिंह चौटाला यांनी राज्यातील सत्ताधारी भाजप-जेजेपी सरकारवर राठींच्या जीवाला धोका असतानाही त्यांना सुरक्षा पुरवली नसल्याचा आरोप केला.

नफे सिंग राठी हत्या प्रकरणी आतापर्यंत एकूण 15 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. एका पोलीस अधिकाऱ्याने सांगितले की, INLD नेत्याचा मुलगा जितेंद्र राठी याच्या वक्तव्याच्या आधारे विजेंद्र राठी, संदीप राठी आणि पाले राम यांच्या विरोधात एफआयआर दाखल करण्यात आला आहे.

Success to Haryana Police, 2 shooters arrested from Goa in case of murder of INEL leader Nafe Singh Rathi

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात