शेतीला आधुनिक करण्यासाठी केंद्रीय अर्थसंकल्पात भरीव तरतुदी, पंतप्रधानांची माहिती

विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली : शेतीला आधुनिक बनविण्याच्या दृष्टीने केंद्रीय अर्थसंकल्पात भरीव तरतुदी करण्यात आल्या असल्याची माहिती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कृषी विषयावरील वेबिनारमध्ये बोलताना दिली. बरोबर तीन वर्षांपूर्वी याच दिवशी पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेची सुरुवात करण्यात आली होती, असेही मोदी यांनी यावेळी नमूद केले.Substantial provisions in the Union Budget to modernize agriculture, informed the Prime Minister

पंतप्रधान किसान सन्मान योजनेमुळे छोटा शेतकरी सावरला गेला असल्याचे सांगून मोदी पुढे म्हणाले की, आतापर्यंत या योजनेद्वारे ११ कोटी शेतकºयांना पावणे दोन लाख कोटी रुपयांचे वाटप करण्यात आले आहे.गेल्या सात वर्षांच्या काळात बियाण्यांपासून ते बाजारापर्यंत अनेक नव्या व्यवस्था तयार करण्यात आल्या आहेत.



जुन्या व्यवस्थेत आमूलाग्र बदल घडवून आणण्यात आले आहेत. केवळ सहा वर्षात कृषी क्षेत्राच्या बजेटमध्ये कितीतरी पटीने वाढ झाली आहे. शेतकºयांना दिल्या जाणाºया कजार्चे प्रमाण अडीच पटीने वाढले आहे.

यावेळच्या अर्थसंकल्पात कृषी क्षेत्राला आधुनिक आणि स्मार्ट बनविण्याच्या अनुषंगाने सात मार्ग सुचविण्यात आले आहेत. गंगा नदीकिनारी मिशन मोडवर नैसर्गिक शेती करणे, कृषी आणि फलोद्यानात आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर,

खाद्य तेलाची आयात कमी करण्यासाठी पाम तेल मिशन सशक्त करणे, शेतीशी संबंधित उत्पादनांच्या वाहतुकीसाठी पीएम गती-शक्ति योजना राबवून लॉजिस्टिक्सच्या नव्या व्यवस्था तयार करणे, अ‍ॅग्री वेस्ट मॅनेजमेंटला जास्त संघटित करणे, वेस्ट टू एनर्जी द्वारे शेतकºयांचे उत्पादन वाढविणे आदी मार्गांचा यात समावेश आहे.

Substantial provisions in the Union Budget to modernize agriculture, informed the Prime Minister

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात