प्रतिनिधी
मेरठ : उत्तर प्रदेशातील मेरठमध्ये होळीच्या दहनासाठी वर्गणी घेण्याकरता काही हिंदू तरुण फिरत असताना काही मुसलमान तरुणांनी त्यांना ‘आमच्याकडून वर्गणी घ्या आणि इस्लाम कबूल करा’, असे म्हणत त्यांना डिवचले. त्यामुळे या ठिकाणी हिंदू आणि मुसलमान तरुणांमध्ये वाद झाला, या वादाचे दंगलीत रूपांतर झाले आणि दोन्ही बाजूने दगडफेक झाली. यात २ जण जखमी झाले. या प्रकरणी पोलिसांनी तीन जणांना ताब्यात घेतले असून अजूनही तणाव आहे. Subscribe to Holi, accept Islam
स्थानिक रहिवासी अमित गुप्ता, सोनू प्रजापती आणि मुलू ब्रह्मपुरी पोलिस ठाण्याच्या परिसरातील हरीनगर परिसरात ५० वर्षांपासून होळी दहनाची परंपरा आहे. यासाठी स्थानिक हिंदू नागरिक वर्गणी गोळा करत होते. त्यावेळी त्या भागाचे नगरसेवक शहजाद मेवाती, त्यांचा भाऊही घटनास्थळी पोहोचले आणि त्यांनी त्या हिंदू तरुणांना डिवचायला सुरुवात केली. ‘आमच्याकडून वर्गणी घ्या आणि इस्लाम कबूल करा,असे ते म्हणाले. यानंतर शाहजाद आणि त्याच्या साथीदारांनी हिंदू तरुणांवर हल्ला करण्यास सुरुवात केली. अमित आणि मुल्लू यांना मारहाण केली.
इतकेच नव्हे तर त्या मुसलमान तरुणांनी होळीवर लाथ मारून तिचा अवमान केला. त्यामुळे या ठिकाणी धार्मिक तणाव वाढला आणि अर्धा तास दोन्ही बाजूंनी दगडफेक होत राहिली. यात अनेक वाहनांचे नुकसान झाले. घटनेची माहिती मिळताच ब्रह्मपुरी पोलीस ठाण्याचे पोलीस घटनास्थळी पोहोचले. या प्रकरणात पोलिसांनी तीन लोकांना ताब्यात घेतले, तर अमित आणि मुलू यांना गंभीर जखमी झाल्याचे सांगितले जाते.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App