विशेष प्रतिनिधी
चंदीगड : माझ्याकडे कोणतेही पद राहो किंवा न राहो. मी राहुल आणि प्रियांका वढेरा यांच्या पाठीशी उभा राहील, अशी नरमाईची भूमिका प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा देणारे काँग्रेसचे नेते नवज्योतसिंग सिद्धू यांनी घेतली. मी महात्मा गांधी आणि लालबहादूर शास्त्री यांची तत्त्वे कायम ठेवेल.Sidhu claimed that he would stand behind Rahul and Priyanka
पद असो अथवा नसो, मी राहुल गांधी आणि प्रियांका वढेरा यांच्या पाठीशी उभा राहील, असे सिध्दू यांनी म्हटले आहे.सिध्दू म्हणाले, सर्वच नकारात्मक शक्ती माझा पराभव करण्याचा प्रयत्न करतील, पण पंजाबमध्ये विजय मिळवण्यासाठी, पंजाबी बंधुत्व जपण्यासाठी, प्रत्येक पंजाबीच्या विजयासाठी सकारात्मक ऊजेर्चा प्रत्येक कण मी वापरेल, असे सिद्धू यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे.
तत्कालीन मुख्यमंत्री अमरिंदरसिंग आणि नवज्योतसिंग सिद्धू यांच्यातील कडवटपणा वाढल्यानंतर काँग्रेसच्या वरिष्ठ नेतृत्वाने अमरिंदरसिंग यांना पदावरून हटवून चरणजितसिंग चेन्नी यांना मुख्यमंत्री केले आहे. पंजाबमध्ये पुढील वर्षी होणाऱ्या विधानसभा निवडणुकीत सिद्धू उतरल्यास त्यांचा पराभव करेल,
तसेच राहुल गांधी आणि प्रियांका गांधी हे अपरिपक्व नेते असल्याची टीका अमरिंदरसिंग यांनी केली होती. त्याच दिवशी सिद्धू यांनीही प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा दिला होता. राजीनामा दोन दिवसांत मागे घ्या, अन्यथा दुसऱ्या नेत्याची या पदावर नियुक्ती केली जाईल, असा इशारा पक्षाच्या केंद्रीय नेतृत्वाने दिल्यानंतर सिद्धूंनी नरम भूमिका घेत, राजीनामा मागे घेतला होता.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App