विशेष प्रतिनिधी
लखनौ – समाजवादी पक्षाचे प्रमुख अखिलेश यादव यांनी गुन्हेगारीकडून राजकारणाकडे वळलेल्या मुख्तार अन्सारीचा भाऊ सिबगतुल्ला अन्सारीला पक्षात प्रवेश दिल्यावरून भाजपने टीकेची झोड उठविली. बसपचे माजी आमदार असलेल्या सिबगतुल्ला अन्सारी यांनी आपल्या समर्थकांसह नुकताच समाजवादी पक्षात प्रवेश केला.Samajwadi party gets in trouble
त्यावरून भाजपच्या उत्तर प्रदेश शाखेने ट्विटरवरून टीकास्त्र सोडले. डॉन मुख्तार अन्सारीच्या कुटुंबीयांना पक्षात प्रवेश देऊन तुम्ही कोणत्या समाजवादाबद्दल गप्पा मारता, असा सवाल करणारे ट्विट भाजपने केले आहे.
त्याचप्रमाणे, भाजपने मुख्तार अन्सारीचा व्हिडिओही ट्विटसोबत जोडला आहे.सिबगतुल्ला यांनी समाजवादी पक्षात प्रवेश केल्यावरही भाजपने ट्विटरवरून समाजवादी पक्षाला लक्ष्य केले होते. ‘समाजवादी पक्षाचा हाच खरा चेहरा आहे.
सत्तेच्या लालसेपोटी हा पक्ष माफिया मुख्तार अन्सारीच्या नातेवाईकांशी हातमिळवणी करण्यास तयार आहे. मात्र, उत्तर प्रदेशात कोण मुख्यमंत्री आहेत, हे समाजवादी पक्षाने विसरता कामा नये, असे ट्विट भाजपने केले होते.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App