शिवलिंगाला कंडोम घालण्याचे व्यंगचित्र ट्विट करणारी सयोनी घोष ममतांच्या तृणमूळ युवक काँग्रेसची अध्यक्ष

वृत्तसंस्था

कोलकाता – पश्चिम बंगाल विधानसभा निवडणूकीच्या वेळी हिंदू धर्माविषयी पुळका दाखवून गावा – गावांमधल्या मंदिरांमध्ये जाऊन दर्शन घेणाऱ्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी पाशवी बहुमताने सत्तेवर येताच आपले खरे रंग दाखवायला सुरुवात केली आहे. Saayoni Ghosh for being appointed as the new State President of Trinamool Youth Congress.

ममतांनी आपला पुतण्या खासदार अभिषेक बॅनर्जीला विधानसभा निवडणूकीतील कामगिरीचे बक्षीस म्हणून तृणमूळ काँग्रेसचा नेता नंबर २ बनविले आहे. त्याच्याकडे तृणमूळ काँग्रेसचे सरचिटणीसपद सोपविले आहे.

ममतांनी त्या पेक्षाही महत्त्वाची नियुक्ती करीत आपला मूळचा हिंदू धर्मद्वेषी स्वभाव जाहीर केला आहे, तो म्हणजे त्यांनी अभिनेत्री सयोमी घोषला तृणमूळ युवक काँग्रेसच्या अध्यक्षपदी नेमले आहे. हीच ती सयोमी घोष आहे, जिने शिवलिंगाला कंडोम घालण्याचे व्यंगचित्र ट्विट करून हिंदू धर्माचा खुलेआम अपमान केला होता.

https://twitter.com/ExSecularHuman/status/1374081034891894784?s=20

ममता बॅनर्जींवर मुस्लीम तुष्टीकरणाचा आरोप होतातच. पण निवडणूकीच्या वेळी त्यांनी राजकीय चतुराई दाखवून गावा – गावांमध्ये मंदिरांना भेटी देण्याचा सपाटा लावला होता. त्यांनी तेथे आरत्या केल्या. झांजा वाजवल्या. घंटा बडवल्या. शंख फुंकले. त्याचे फोटो आपल्या सोशल मीडिया अकाउंटवर शेअर केले. हे सगळे त्यांनी निवडणूकीच्या मोसमात केले.

निवडणूकीत २१९ जागांचे पाशवी बहुमत मिळताच ममतांनी खरे रंग दाखविले. त्यांनी हिंदू धर्माचा खुलेआम अपमान करणाऱ्या सयोनी घोषला आपल्या पक्षाच्या युवक विभागाचे अध्यक्ष नेमले.

Saayoni Ghosh for being appointed as the new State President of Trinamool Youth Congress.

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात