वृत्तसंस्था
हैदराबाद : Revanth Reddy तेलंगणामध्ये दोन मुद्द्यांवरून राजकीय भूकंप झाला आहे. पहिला मुद्दा मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांचे विधान आहे, जे त्यांनी आदल्या दिवशी हैदराबादमधील हरिता व्हॅली रिसॉर्टमध्ये जिल्हा काँग्रेस कमिटीच्या बैठकीत केले. यात त्यांनी कार्यकर्त्यांना सांगितले की, गांधी कुटुंबाला गरज भासल्यास आर्थिक मदत देण्यासाठी त्यांनी तयार राहावे. जर गांधी कुटुंबाने मदत मागितली तर ते १ हजार कोटी रुपयेही जमा करू शकतात. या विधानानंतर रेवंत रेड्डी विरोधकांच्या निशाण्यावर आले.Revanth Reddy
भाजप आणि बीआरएस या दोन्ही पक्षांनी तेलंगण राज्य काँग्रेस कमिटीला गांधी कुटुंबाचे ‘एटीएम’ म्हटले. भाजपचे प्रदेश मुख्य प्रवक्ते एन.व्ही. सुभाष यांनी सवाल केला की मुख्यमंत्र्यांना लाज वाटली पाहिजे. जेव्हा राज्याचा तिजोरीवर ताण आहे, कल्याणकारी योजना प्रलंबित आहेत आणि कर्मचाऱ्यांच्या पगाराला उशीर होत आहे, तेव्हा मुख्यमंत्री एका कुटुंबासाठी निधी गोळा करण्याबद्दल कसे काय बोलू शकतात? यावर उपमुख्यमंत्री मल्लू भट्टी विक्रमार्क यांचे म्हणणे आहे की, मुख्यमंत्र्यांचा उद्देश सामूहिक शक्तीबद्दल होता, कोणत्याही बेकायदेशीर वसुलीबद्दल नव्हता.Revanth Reddy
मुख्यमंत्र्यांच्या सुरक्षेत त्रुटी
दुसरे प्रकरण मुख्यमंत्र्यांच्या सुरक्षा प्रोटोकॉलशी संबंधित आहे. ज्येष्ठ काँग्रेस नेते मर्री शशिधर रेड्डी यांनी पोलीस महासंचालकांना पत्र लिहून मुख्यमंत्र्यांच्या सुरक्षेशी तडजोड केल्याचा आरोप केला. पत्रात अक्रम अली मोहम्मद नावाच्या व्यक्तीचा उल्लेख आहे, जो मुख्यमंत्र्यांच्या उच्चस्तरीय बैठकीत दिसून आला आहे. रेड्डी यांच्या मते, या व्यक्तीचा पासपोर्ट रद्द आहे.
राज्यावर ५ लाख कोटींचे कर्ज, योजना रखडल्या
कॅग अहवालानुसार तेलंगण आर्थिकदृष्ट्या वाईट टप्प्यातून जात आहे. राज्यावर ५ लाख कोटींहून अधिक कर्ज आहे. मुख्यमंत्री रेवंत यांनी राज्यासाठी ठरवून दिलेल्या मर्यादेपेक्षा १२८% जास्त कर्ज घेतले आहे. २.२९ लाख कोटींच्या महसुलापैकी केवळ १.३८ लाख कोटीच मिळाल्यामुळे राज्याच्या ‘६ गॅरंटी’ सारख्या कल्याणकारी योजना थांबल्या आहेत. विकासाचे प्रकल्प रखडले आहेत.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App