विशेष प्रतिनिधी
नाशिक : रामतीर्थ गोदावरी आरती समितीच्या वतीने गेल्या तीन वर्षांपासून दक्षिण गंगा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पवित्र गोदावरी नदीची दुतोंड्या मारुती मूर्ती जवळ दररोज नियमित महाआरती केली जात आहे. पाऊस,उन्हाळा अथवा हिवाळा अशा कोणत्याही ऋतूमध्ये ही सेवा अखंडपणे सुरू असून, गोदामातेप्रती श्रद्धा आणि कृतज्ञतेचे हे एक अनोखे उदाहरण ठरले आहे.Ramtirth Godavari Aarti Samiti
सध्या नाशिक शहर आणि परिसरात झालेल्या अतिवृष्टीमुळे गोदावरी नदीला मोठा पूर आला आहे. पुराची तीव्रता इतकी आहे, की दुतोंड्या मारुतीच्या मूर्तीच्या डोक्यावरून पाणी वाहू लागले, की त्या परिस्थितीला महापूर मानले जाते. यंदाही अशीच परिस्थिती निर्माण झाली असून, गोदावरीने रौद्र रूप धारण केले आहे. दरम्यान, पावसाचा जोर आता काहीसा कमी होत असल्याचे दिसून येत आहे.
– सर्वांच्या सुख समृद्धीसाठी प्रार्थना
या पार्श्वभूमीवर शुक्रवारी दि. २४ जुलै २०२६ रोजी सायंकाळी ६.३० वाजता दुतोंड्या मारुती मंदिर परिसरात पुराच्या पाण्यात विशेष जलमहाआरतीचे आयोजन करण्यात आले होते .
या महाआरतीद्वारे गोदामातेला विनम्र प्रार्थना करण्यात आली आहे की, तिचे हे रौद्र स्वरूप शांत व्हावे, जनजीवन पूर्वपदावर यावे आणि समाजावर कोणतेही संकट अथवा आपत्ती ओढवू नये. तसेच सर्वांच्या सुख, शांती, सुरक्षितता आणि समृद्धीसाठी सामूहिक प्रार्थना करण्यात आली आहे.
रामतीर्थ गोदावरी
Ramtirth Godavari Aarti Samiti performs ‘Jal-Maha-Aarti’ at Dutondya Maruti for peace along the Godavari; enthusiastic response from Nashik residents!!
महत्वाच्या बातम्या
- सुप्रीम कोर्टाने केंद्र सरकार आणि नॅशनल टेस्टिंग एजन्सीला फटकारताच कठोर कायदेशीर कारवाई; NTA ४७ अधिकारी बडतर्फ!!
- बांगलादेशाच्या अध्यक्षांचा अखेर राजीनामा; सांगितलेली आणि नेमकी खरी कारणे कोणती??
- धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्याच्या अलीकडच्या CJP च्या दोन मागण्या मान्य; जे. पी. नड्डा आणि जितेंद्र सिंह यांची CJP शी उद्या पुन्हा चर्चा
- सुप्रीम कोर्टाचे कार्ड एक्टिव्हेट; सुप्रीम कोर्टाने केंद्र सरकार आणि NTA कोणते दिले निर्देश??; वाचा सविस्तर!!