गोदावरीच्या शांततेसाठी रामतीर्थ गोदावरी आरती समितीची दुतोंड्या मारुती येथे जलमहाआरती; नाशिककरांचा उस्फूर्त प्रतिसाद!!
रामतीर्थ गोदावरी आरती समितीच्या वतीने गेल्या तीन वर्षांपासून दक्षिण गंगा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पवित्र गोदावरी नदीची दुतोंड्या मारुती मूर्ती जवळ दररोज नियमित महाआरती केली जात आहे. पाऊस,उन्हाळा अथवा हिवाळा अशा कोणत्याही ऋतूमध्ये ही सेवा अखंडपणे सुरू असून, गोदामातेप्रती श्रद्धा आणि कृतज्ञतेचे हे एक अनोखे उदाहरण ठरले आहे.