राजस्थान : सामूहिक बलात्कारानंतर १४ वर्षीय मुलींला भट्टीत फेकलं, तेव्हा ती होती जिवंत – खळबळजनक माहिती उघड!


मुलीच्या शरीराचे काही जळालेल्या अवयव भट्टीत सापडले, तर काही भाग ठिकठिकाणी विखुरलेले होते.

विशेष प्रतिनिधी

जयपूर: राजस्थानमधील भिलवाडा येथे सामूहिक बलात्कार झालेल्या अल्पवयीन मुलीच्या शरीराचे अवयव कोळशाच्या भट्टीत सापडल्याच्या जवळपास एक महिन्यानंतर, पोलिसांनी शनिवारी आरोपपत्र दाखल केले की, मुलगी जाळली गेली तेव्हा ती जिवंत होती, अशी खळबळजनक  माहिती समोर आली आहे. Rajasthan After gang  rape girls were alive when they were thrown into the furnace

तपास अधिकारी (IO) आणि कोटारी डीएसपी श्याम सुंदर बिश्नोई यांनी शाहपुरा जिल्ह्यातील पोक्सो कोर्टासमोर दाखल केलेले आरोपपत्र 400 हून अधिक पानांचे आहे आणि 11 पैकी नऊ आरोपींची नावे आहेत.

या गुन्ह्यात सहभागी असलेल्या दोन अल्पवयीन मुलांविरुद्ध स्वतंत्र आरोपपत्र दाखल करण्यात येणार आहे. आता शाहपुरा जिल्ह्याचा भाग असलेल्या भीलवाडा येथील कोआत्री येथे 3 ऑगस्ट रोजी 14 वर्षीय मुलीवर सामूहिक बलात्कार करण्यात आला आणि तिला जाळून टाकण्यात आले होते.

वरिष्ठ पोलीस अधिकार्‍यांनी सांगितले की, या भीषण प्रकरणातील सर्वात आव्हानात्मक तपासाचा सामना करावा लागला.  मुली्च्या जळालेल्या शरीराचे काही अवयव भट्टीतून सापडले, तर काही भाग ठिकठिकाणी विखुरलेले होते. फॉरेन्सिक तपासणीसाठी हे भाग  काळजीपूर्वक गोळा करणे आणि जतन करणे आवश्यक होते.

Rajasthan After gang  rape girls were alive when they were thrown into the furnace

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात