• Download App
    एकीकडे नवचैतन्याचा "चिंतन" घाट; दुसरीकडे राहुल अध्यक्षपदासाठी पाठिंब्याची लाट; पण यक्षप्रश्न अनुत्तरीतच!!Rahul, on the other hand, has a wave of support for the presidency; But the Yaksha question remains unanswered

    Congress : एकीकडे नवचैतन्याचा “चिंतन” घाट; दुसरीकडे राहुलच्या अध्यक्षपदासाठी पाठिंब्याची लाट; पण यक्षप्रश्न अनुत्तरीतच!!

     

    काँग्रेस पक्षाचा अंतर्गत होत असलेल्या महामंथनातून एकीकडे पक्षात नवचैतन्य भरण्याचा “चिंतन” घाट घातला जातो आहे, तर दुसरीकडे राहुल गांधींना काँग्रेसच्या अध्यक्षपदी पुन्हा बसविण्याची पाठिंब्याची लाट आली आहे!! Rahul, on the other hand, has a wave of support for the presidency; But the Yaksha question remains unanswered

    काँग्रेसचे दोन दिवसांचे चिंतन शिबिर उद्या 13 मे रोजी राजस्थान मधल्या उदयपुरमध्ये सुरू होणार आहे. काँग्रेसच्या हंगामी अध्यक्ष सोनिया गांधी यांच्या भाषणाने सुरु होणाऱ्या चिंतन शिबिराचा समारोप राहुल गांधी यांच्या भाषणाने होणार आहे. त्यामुळेच राहुल गांधी हेच पुन्हा काँग्रेसच्या अध्यक्षपदाची धुरा हाती घेतील, असे काँग्रेसचे नेते असे मानून चालले आहेत.

    काँग्रेसच्या चिंतन शिबिरामध्ये 400 नेते सहभागी होणार असल्याची माहिती राजस्थानचे माजी उपमुख्यमंत्री आणि बंडखोर नेते सचिन पायलट यांनी दिली आहे. ते राजस्थानच्या विद्यमान मुख्यमंत्र्यांवर जरी नाराज असले तरी चिंतन शिबिरात मात्र उत्साहाने भाग घेणार आहेत. काँग्रेसने नवसंकल्प चिंतन शिबीर असे नाव देऊन आपला इरादा स्पष्ट केला आहे. काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये चैतन्य भरण्यासाठी हे चिंतन शिबिर होत आहे. त्यात आम्ही यशस्वी होऊ, असे सचिन पायलट म्हणाले आहेत.



    एकीकडे उदयपूर चिंतन शिबिराची तयारी सुरू असताना दुसरीकडे राहुल गांधींनी अध्यक्षपदाची धुरा पुन्हा खांद्यावर घ्यावी यासाठी त्यांच्या पाठीशी नेत्यांचा जमावडा उभे करण्याचे काम पक्षात जोरात सुरू आहे. काँग्रेसचे लोकसभेतील गटनेते अधीर रंजन चौधरी यांनी त्यासाठी पुढाकार घेतला आहे. त्यांनी स्वतः राहुल गांधींचे अध्यक्षपदाचे वक्तव्य करून इतर नेत्यांनाही टप्प्याटप्प्याने अशी वक्तव्ये करण्यासाठी प्रोत्साहित केले आहे. यातून राहुल गांधींच्या अध्यक्षपदासाठी राजकीय पीच तयार करण्याची काँग्रेसची योजना आहे.

    राहुल गांधींनी 2019 मध्ये लोकसभेतील पराभवाची जबाबदारी घेऊन राजीनामा दिला होता. त्यानंतरच्या प्रत्येक निवडणुकीत एखाद-दुसरा अपवाद वगळता काँग्रेसचा दणकून पराभव झाला आहे. उत्तर प्रदेशात तर काँग्रेस फक्त दोन आमदार निवडून आणू शकली आहे. पश्चिम बंगाल मध्ये काँग्रेसचे 0 आमदार आहेत. या दोन्ही राज्यांमध्ये स्वतः राहुल गांधी आणि प्रियांका गांधी यांनी आपल्या खांद्यावर काँग्रेसच्या निवडणूक प्रचाराची धुरा घेतली होती.

    अशा स्थितीत एकीकडे काँग्रेसने भले नवसंकल्प चिंतन शिबीर असे नाव दिले असले तरी जर पुन्हा “त्याच” राहुल गांधींच्या खांद्यावर पक्ष अध्यक्ष पदाची धुरा देणार असतील तर पक्षात नवचैतन्य कसे भरले जाईल हा प्रश्न अनुत्तरीत राहणार आहे. राहुल गांधी हे एक प्रकारे “टेस्टेड मिसाईल” आहे. त्यांची निवडणूक जिंकण्याची अक्षमता गेल्या अनेक निवडणुकांमध्ये स्पष्ट झाली आहे. अशा स्थितीत राहुल गांधी पुन्हा एकदा काँग्रेस अध्यक्षपदाची धुरा हाती येऊन पक्षामध्ये अशी कोणती जादूची कांडी फिरवणार आहेत?? त्यांच्याकडे पक्षात नवचैतन्य भरण्यासाठी अशी कोणती योजना आहे की ज्यामुळे पक्षाला फिरून चांगले दिवस येतील?? पक्षामधील गटबाजी संपेल आणि पक्षाचे कार्यकर्ते खऱ्या अर्थाने प्रोत्साहन घेऊन कामाला लागू शकतील??

    निवडणूक रणनीतीकार आणि बिहारमधले उदयन्मुख होऊ घातलेले नेते प्रशांत किशोर यांनी काँग्रेसला एक फॉर्म्युला सुचवला होता. यामध्ये गांधी परिवाराने पिछाडीवर राहुन नवीन नेतृत्वाला पक्षसंघटनेत संधी देण्याचा विषय होता. परंतु आता जर राहुल गांधी हेच पुन्हा काँग्रेसच्या अध्यक्षपदाची धुरा स्वीकारणार असतील तर पक्षात “गांधी नसलेले” नवे नेतृत्व कसे तयार होईल?? जर नेतृत्व तयार झाले नाही तर पक्षात मुळापासून पुन्हा उभारणीसाठी पुढाकार कोण घेईल?? हे यक्षप्रश्न सध्यातरी अनुत्तरीतच राहणार आहेत.

    Rahul, on the other hand, has a wave of support for the presidency; But the Yaksha question remains unanswered

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    Chinese app : भारताचा चुकीचा नकाशा दाखवणारे चिनी अॅप हटवण्याचे सरकारने गुगलला दिले आदेश

    Pope Francis : ख्रिश्चन धर्मगुरू पोप फ्रान्सिस यांचे निधन

    Bokaro : बोकारोमध्ये एक कोटी इनामीसह आठ नक्षलवादी ठार!