• Download App
    Rahul Gandhi माफीवीर"नंतर राहुल गांधींचा लोकसभेत नवा आरोप;

    Rahul Gandhi : “माफीवीर”नंतर राहुल गांधींचा लोकसभेत नवा आरोप; म्हणाले, सावरकर हे तर मनुस्मृतीचे समर्थक!!; पण वास्तव काय??

    Rahul Gandhi

     

    नाशिक : Rahul Gandhi  भारताच्या क्रांती लढाईचे अग्रणी स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या बदनामी बद्दल देशभरातल्या वेगवेगळ्या कोर्टांमधून कायदेशीर लढाई लढाव्या लागणाऱ्या राहुल गांधींनी स्वातंत्र्यवीर सावरकरांवर “माफीवीर” या आरोपानंतर लोकसभेत आज नवा आरोप केला. सावरकर हे राज्यघटनेचे नव्हे, तर मनुस्मृतीचे समर्थक होते, असा दावा राहुल गांधींनी केला.Rahul Gandhi

    राज्यघटनेच्या 75 व्या वर्धापन दिनानिमित्त केंद्रातील मोदी सरकारने संसदेत विशेष चर्चा प्रस्तावित केली. त्यावर विविध नेत्यांची भाषणे झाली. यामध्ये आज लोकसभेतले विरोधी पक्ष नेते राहुल गांधींचे भाषण झाले. त्यांनी आपल्या भाषणाची सुरुवातच सावरकरांच्या नव्या बदनामीने केली. राहुल गांधी आधीच सावरकरांच्या बदनामी बद्दल कोर्टामध्ये वेगवेगळ्या केसेस मध्ये अडकले आहेत. कोर्टाने विविध कोर्टाने त्यांना समन्स बजावली आहेत. त्यामुळे मध्यंतरीच्या काळात राहुल गांधींनी सावरकरांची बदनामी करणे थांबविले होते, पण आज लोकसभेत मात्र राज्यघटनेवर चर्चा सुरू करताना भाषणाच्या सुरुवातीलाच त्यांनी नव्या मुद्द्यावर सावरकरांची बदनामी केली.



     

    स्वातंत्र्यवीर सावरकर म्हणे, देशाच्या राज्यघटनेचे नव्हे, तर मनुस्मृतीचे समर्थक होते. त्यांना देश राज्यघटनेनुसार नव्हे, तर मनुस्मृतीनुसार चालवायचा होता, असा दावा राहुल गांधींनी केला. देशात वर्षानुवर्षे मनुस्मृती हाच कायदा अस्तित्वात होता. आपल्या राज्यघटनेत भारतीय म्हणावे, असे काहीही नाही, पण मनुस्मृती मात्र आज कायदा आहे. देश त्या मनुस्मृतीच्या कायद्यानुसार चालला पाहिजे, असे सावरकरांनी स्वतः लिहिले असल्याचा दावा राहुल गांधींनी एका पुस्तकाच्या आधारे केला.

    केंद्रातले मोदी सरकार सावरकर या सर्वोच्च नेत्याच्या विचारांच्या आधारावरच काम करते. ते लोकसभेत भाषण करताना राज्यघटनेवर बोलतात, याचा अर्थ ते सावरकरांची बदनामी करतात. सावरकरांचे विचारते मान्य करत नाहीत असाच होतो, असा अजब दावा देखील राहुल गांधींनी चर्चेच्या सुरुवातीलाच केला.

    – वास्तव काय??

    वास्तविक सावरकरांनी कधीच मनुस्मृतीचे समर्थन केले नाही. उलट महाड सत्याग्रहाच्या वेळी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी मनुस्मृती जाळली, त्या आंदोलनाला सावरकरांनी पाठिंबा दिला होता, पण केवळ एक पुस्तक जाळून काही होणार नाही. त्यासाठी जातीव्यवस्था पूर्णपणे उकडून टाकली पाहिजे, असे मत त्यावेळी सावरकरांनी व्यक्त केले होते. त्याचबरोबर मनुस्मृतिसकट सगळे धर्मग्रंथ हे इतिहास ग्रंथ म्हणून कपाटात ठेवावेत. फारतर त्यांचे जतन करावे. एक ऐतिहासिक संदर्भ म्हणून त्याकडे पाहावे. परंतु, आधुनिक काळाच्या विज्ञान युगात भारत देश हा “श्रुती स्मृती पुराणोक्त” पद्धतीने न चालवता, तो आधुनिक विज्ञानाच्या विचारांच्या प्रकाशातच चालावावा, असे ठाम प्रतिपादन सावरकरांनी आपल्या विविध लेखनांमधून आणि भाषणांमधून केले होते. यासाठी त्यांचा “दोन शब्दांत दोन संस्कृती” हा लेख अत्यंत प्रसिद्ध आहे. त्यामध्ये त्यांनी कधीही जाती व्यवस्थेचे अथवा मनुस्मृतीचे समर्थन केलेले नव्हते.

    सावरकरांनी रत्नागिरीतील आपल्या सामाजिक कार्यात सप्तबंदी तोडण्याचा आग्रह धरला होता. त्यामध्ये जाती व्यवस्थेने निर्माण केलेली बंदी तोडणे, हा अत्यंत महत्त्वाचा घटक होता. सावरकरांनी सुरुवातीला रत्नागिरी जिल्ह्यात आणि त्यानंतर देशभरात अनेक ठिकाणी सर्व जाती जमातींना एकत्र करणारी सहभोजने आयोजित केली होती. इतकेच काय, तर सावरकर आंतरजातीय विवाहाचे देखील समर्थक होते. त्यामुळे आधुनिक विचाराची कास धरणाऱ्या सावरकरांनी मनुस्मृतीचे समर्थन करणे कदापि शक्य नव्हते. परंतु, राहुल गांधींनी सावरकरांच्या लिखाणातला कुठला अर्धवट भाग वाचून दाखवून लोकसभेतल्या भाषणांमध्ये त्यांची नव्या मुद्द्यावर बदनामी केली.

    Rahul Gandhi’s New Allegation in Lok Sabha After “Mafiveer”; Said, Savarkar is a supporter of Manusmriti!!; But what is the reality?

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    ठाकरे बंधू एकत्र; पवार + काँग्रेस अस्वस्थ!!

    Malegaon : मालेगाव बॉम्बस्फोट खटल्याचा निकाल न्यायालयाने ठेवला राखून

    Murshidabad : मुर्शिदाबाद हिंसाचार प्रकरणी सर्वोच्च न्यायालयात दाखल याचिकांवर उद्या होणार सुनावणी