• Download App
    Maharashtra ministry formula मंत्रिमंडळ विस्तारात भाजपचेच वर्चस्व??; हे तर महाराष्ट्राच्या जनमताच्या कौलाचे प्रतिबिंब!!

    Maharashtra ministry formula : मंत्रिमंडळ विस्तारात भाजपचेच वर्चस्व??; हे तर महाराष्ट्राच्या जनमताच्या कौलाचे प्रतिबिंब!!

    नाशिक : मंत्रिमंडळ विस्तार भाजपचेच वर्चस्व; महाराष्ट्राच्या जनमताच्या कौलाचे प्रतिबिंब!! हेच चित्र उद्या दिसण्याची दाट शक्यता आहे. मंत्रिमंडळ विस्ताराचे प्रसार माध्यमांमध्ये वर्णन महाराष्ट्राच्या जनमताशी विसंगतच राहिले. ते प्रामुख्याने एकनाथ शिंदे किंवा अजित पवार केंद्रित राहिले, पण महाराष्ट्राच्या जनमताचा कौल शिंदे किंवा अजितदादा केंद्रित नसून तो भाजप केंद्रीत आहे. त्यामुळे मंत्रिमंडळ विस्तारावर भाजपचेच वर्चस्व असणे जनमताच्या कौलाशी सुसंगत आहे.

    जनमताचा कौल कसाही येवो, सत्तेवर आम्हीच येणार, महाराष्ट्रातील सिस्टीम आम्हीच बसवणार, अशा थाटाची राजकीय परिस्थिती ठाकरे आणि पवारांनी 2019 ते 2022 दरम्यान आणली होती. मराठी माध्यमांचे रिपोर्टिंग देखील त्यांनाच अनुकूल राहिले होते. वास्तविक 2019 मध्ये ठाकरे आणि पवारांनी महाराष्ट्राच्या जनमताचा कौल पायदळी तुडवला होता, पण तेव्हा त्यांनी लोकशाहीची पायमल्ली केल्याचे रिपोर्टिंग मराठी माध्यमांनी केले नव्हते. मराठी माध्यमांचे रिपोर्टिंग आजही बदललेले नसून ते ठाकरे + पवारांना अनुकूल आणि महायुतीमध्ये शिंदे + अजितदादा केंद्रितच राहिले.

    BMC elections : बीएमसी निवडणुकीसंदर्भात झालेल्या बैठकीनंतर शिंदेंचं मोठे वक्तव्य, म्हणाले…

    महायुतीमध्ये भाजप जर आकड्यांमध्ये मोठ्या पक्ष आहे, त्या पक्षाचा मुख्यमंत्री आहे, तर मंत्रिमंडळ विस्तारामध्ये भाजपचेच वर्चस्व असणे हे जनमताशा कौलाशी सुसंगत असताना प्रत्यक्षात मराठी माध्यमांचे रिपोर्टिंग एकनाथ शिंदेंना गृह खाते मिळणार का??, अजित पवारांना अर्थ खाते मिळणार का??, या दोन नेत्यांना ती खाती मिळाली नाहीत, तर त्यांच्यावर भाजपने “अन्याय” केला अशा स्वरूपाचे चित्र निर्माण करणारे राहिले. जणू काही एकनाथ शिंदेंना गृह खाते मिळाले नाही आणि अजित पवारांना अर्थ खाते मिळाले नाही, तर महाराष्ट्राचा कारभार चालणारच नाही, अशा स्वरूपाचे नॅरेटिव्ह मराठी माध्यमांनी सेट केले. शिंदे आणि अजितदादांच्या पक्षांचे प्रवक्ते आपणच महाराष्ट्राचे मुख्य सत्ताधारी असल्याच्या थाटात पत्रकारांना बाईट देत होते. पण भाजपचे राजकारण असल्या बाईट वर आधारित नाही, याचा प्रत्यय उद्या येण्याची दाट शक्यता आहे.

    … आणि मूळातच जर कौल भाजपला सर्वाधिक अनुकूल आणि त्यानंतर एकनाथ शिंदे आणि अजित पवारांच्या पक्षाचा नंबर नंतर असेल, तर महाराष्ट्रातील महत्त्वाची खाती भाजपच्याच पदरात पडणार हे उघड राजकीय गुपित आहे. पण त्यावर फारशी मराठी माध्यमांनी चर्चा केली नाही. उलट एकनाथ शिंदे आणि अजित पवार हेच राज्यशकट चालवतात आणि भाजप यांचा टेकू घेतो, असे चित्र निर्माण करण्यात माध्यमांनी धन्यता मानली. पण महाराष्ट्राच्या जनमताशा कौलाशी ती विसंगत होती.

    त्यामुळे उद्याच्या मंत्रिमंडळ विस्तारात भाजपचे वर्चस्व राहिले आणि त्या तुलनेत एकनाथ शिंदे आणि अजित पवारांच्या पक्षांना दुय्यम आणि तिय्यम स्थान राहिले, तर त्यात त्या दोन नेत्यांवर अन्याय वगैरे काही झाला नसून, उलट महाराष्ट्राने दिलेल्या जनमताच्या कौलाचा आदर करूनच मंत्रिमंडळ विस्तार झाल्याचे मानले पाहिजे. बाकी कुणीही कितीही महाराष्ट्राच्या स्वाभिमानाच्या गप्पा मारल्या, तरी कुणाचे किती मंत्री आणि कुणाला कोणती खाती, हे सगळे दिल्लीत ठरते, हा “नियम” देखील नव्या मंत्रिमंडळाच्या विस्तारात अबाधित राहिला, हे देखील मान्य करावे लागेल.

    Maharashtra ministry formula, BJP dominance; reflects the real mandate

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    रेस मधली चार बडी नावे बाजूला सारून हर्षवर्धन सपकाळ महाराष्ट्र काँग्रेसचे नवे प्रदेशाध्यक्ष!!

    Devendra Fadnavis : महानगर विकासाची नवी रणनीती! दोन टप्प्यांत पायाभूत सुविधा आखण्याचे निर्देश

    Pune : पुण्यासाठी ट्वीन टनल, नवीन रस्ते अन् CNG बसेस