आठ आमदारांना अपात्र ठरवण्याच्या याचिकेवर सुनावणी करण्यास नकार
विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : Supreme Court सर्वोच्च न्यायालयाकडून काँग्रेसला पुन्हा एकदा धक्का बसला आहे. काँग्रेसच्या आठ आमदारांना अपात्र ठरवण्याच्या याचिकेवर सुनावणी करण्यास सर्वोच्च न्यायालयाने नकार दिला. खरंतर, गोवा विधानसभेचे अध्यक्ष रमेश तवडकर यांनी अलीकडेच ती याचिका फेटाळली होतीSupreme Court
ज्यात काँग्रेसने २०२२ मध्ये भाजपमध्ये सामील झालेल्या आठ आमदारांना अपात्र ठरवण्याची मागणी केली होती. याचिका फेटाळताना विधानसभा अध्यक्षांनी म्हटले होते की, जर एखाद्या पक्षाचे दोन तृतीयांश आमदार पक्षाशी असहमत असतील तर त्यांना अपात्र ठरवले जाऊ शकते.
या निर्णयाला आव्हान देत काँग्रेसने सुप्रीम कोर्टात धाव घेतली होती, तिथेही त्यांची निराशा झाली होती. मुख्य न्यायमूर्ती संजीव खन्ना आणि न्यायमूर्ती संजय कुमार यांच्या खंडपीठाने काँग्रेस नेते गिरीश चोडणकर यांना विधानसभा अध्यक्षांच्या निर्णयाला आव्हान देण्यासाठी मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठात जाण्यास सांगितले
A big blow to Goa Congress from the Supreme Court
महत्वाच्या बातम्या
- Tamil Nadu तामिळनाडूतील खासगी रुग्णालयास भीषण आग, 7 जणांचा मृत्यू
- BMC elections : बीएमसी निवडणुकीसंदर्भात झालेल्या बैठकीनंतर शिंदेंचं मोठे वक्तव्य, म्हणाले…
- One Nation One Election : विधेयकाला मोदी सरकारची मंजूरी, पण ते JPC कडे पाठवायची काँग्रेसची तयारी!!
- Dantewada : दंतेवाड्यात नक्षलवादी अन् सुरक्षा दलांमध्ये चकमक, सात माओवादी ठार