विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : मोदीविरोधात आंधळे झालेल्या काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्यावर पुन्हा एकदा भारताच्या अंतर्गत प्रश्नांमध्ये परदेशी शक्तींना हस्तक्षेप करण्यासाठी चिथावणी दिल्याचा आरोप होत आहे. यावेळी अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना अदानी प्रकरणाचा वापर करून भारतावर दबाव टाकावा अशी अप्रत्यक्ष भूमिका राहुल गांधींनी घेतल्याचे दिसून आले आहे. Rahul Gandhi
ट्रम्प यांनी अलीकडेच भारताच्या अर्थव्यवस्थेला “डेड इकॉनॉमी” (मृत अर्थव्यवस्था) म्हणून संबोधले होते. त्यानंतर राहुल गांधी यांनी त्यांच्या विधानाचे समर्थन करत ट्वीट केले की, “भारताने समजून घेतले पाहिजे की, पंतप्रधान मोदी ट्रम्प यांना उत्तर का देऊ शकत नाहीत. कारण अमेरिकेत अदानीविरोधात सुरू असलेल्या चौकशीमुळे त्यांचे हात बांधले गेले आहेत. ट्रम्प यांच्याकडून मोदी-आदानी-रशियन तेल व्यवहार उघड करण्याचा धोका आहे.”
इस्रायलच्या गुप्तचर संस्था मोसाद ने एका गुप्त ऑपरेशनमध्ये राहुल गांधी, सॅम पित्रोदा (इंडियन ओव्हरसीज काँग्रेस प्रमुख) आणि अमेरिकन हिंडनबर्ग रिसर्च यांच्यातील संबंध उघड केल्याचा दावा केला आहे.
मोसादने पित्रोदा यांच्या होम-सर्व्हरवरील मेल्स डिक्रिप्ट केल्याचे सांगितले जाते. या संवादातून अदानी समूहाविरोधात हिंडनबर्गच्या 2023 रिपोर्टद्वारे चालवलेली बदनामी मोहीम समोर आली. या मोहिमेचा उद्देश पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे सरकार आणि भारताच्या अर्थव्यवस्थेची आंतरराष्ट्रीय पातळीवर प्रतिमा मलीन करणे हा होता, असा आरोप करण्यात आला आहे.
विशेष म्हणजे, हा अहवाल त्या काळात प्रसिद्ध झाला होता जेव्हा अदानी ग्रुप इस्रायलमधील हायफा बंदराची $1.2 अब्ज डील पूर्ण करत होता. यामुळे इस्रायली सरकारने याला रणनीतिक हल्ला मानत ऑपरेशन झेपेलिन राबवले होते.
राहुल गांधींच्या 2023 च्या अमेरिकन दौऱ्यात त्यांनी परराष्ट्र मंत्रालयाच्या परवानगीशिवाय व्हाइट हाऊसमध्ये गुप्त बैठका घेतल्याचा आरोप आहे. याच दौऱ्यात त्यांनी हडसन हाऊस येथे सुनीता विश्वनाथन (सोरोस-संलग्न हिंदूज फॉर ह्युमन राईट्स संघटनेच्या सह-संस्थापक) यांच्यासोबत कार्यक्रमात हजेरी लावली होती.
जॉर्ज सोरोस यांनी सार्वजनिकपणे भारतात राजवट बदलण्याचे आवाहन केले होते. त्यांच्या ओपन सोसायटी फाउंडेशनने अशा अनेक संस्थांना आर्थिक पाठबळ दिले ज्यांनी अदानी समूहावर आरोप करणारे अहवाल प्रकाशित केले होते.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App