वृत्तसंस्था
बेळगावी : एकीकडे काँग्रेसचे खासदार राहुल गांधी भारत जोडो यात्रेच्या निमित्ताने वेगवेगळ्या प्रार्थना स्थळांमध्ये जाऊन पूजा अर्चा करत आहेत, तर दुसरीकडे ज्या कर्नाटक राज्यातून राहुल गांधी भारत जोडो यात्रा करून आले आहेत, त्या कर्नाटकात काँग्रेसच्या कार्यकारी अध्यक्षांनी हिंदू शब्दावर वादग्रस्त वक्तव्य केले आहे. Rahul Gandhi’s Bharat Jodo Yatra, on the other hand, Karnataka Congress President’s controversial statement on the word Hindu
हिंदू हा शब्द भारतीय नाही तो पर्शियन आहे. त्या शब्दाचा अर्थ अत्यंत घाणेरडा आहे, असे वादग्रस्त वक्तव्य कर्नाटक काँग्रेस कार्यकारी अध्यक्ष सतीश जारकीहोळी यांनी केले आहे.
बेळगाव जिल्ह्यातील निपाणी येथे एका कार्यक्रमात सतीश जारकीहोळी यांनी हिंदू शब्दावर वादग्रस्त वक्तव्य केले. ते म्हणाले की, तुम्ही आमच्यावर हिंदू धर्म शब्द का लादता? कसला हिंदू धर्म?, हिंदू हा शब्दच मूळात भारतीय नाही. तो पर्शियन शब्द आहे. तो इराण, इराक कझाकस्तान इथून आला आहे. हिंदू शब्दाचा अर्थ तुम्ही पाहिलात तर तो अत्यंत घाणेरडा आहे. मग असा शब्द तुम्ही आमच्यावर का लादता?, असा सवाल सतीश जारकीहोळी यांनी केला आहे.
एकीकडे खासदार राहुल गांधी आपल्या भारत जोडो यात्रेमध्ये विविध धर्मीयांच्या प्रार्थना स्थळांमध्ये जाऊन तिथल्या धर्मगुरूंशी चर्चा करत आहेत. हिंदू मंदिरांमध्ये स्थळांमध्ये जाऊन पूजाअर्चा करत आहेत. आजही नांदेडच्या गुरुद्वारा मध्ये जाऊन ते पूजाअर्चा करून तिथल्या लंगर मध्ये सहभागी होणार आहेत. कर्नाटक मध्ये देखील त्यांनी अनेक मठ मंदिरांमध्ये जाऊन भारत जोडो यात्रेदरम्यान दर्शने घेतली आहेत. या पार्श्वभूमीवर राहुल गांधींची भारत जवळ यात्रा सुरू असतानाच कर्नाटक काँग्रेसच्या कार्यकारी अध्यक्ष यांनी हिंदू शब्दावर वादग्रस्त वक्तव्य केल्याने सोशल मीडियावर त्यांच्यावर टीकेचा भडीमार होतो आहे.
Rahul Gandhi’s Bharat Jodo Yatra, on the other hand, Karnataka Congress President’s controversial statement on the word Hindu
महत्वाच्या बातम्या
- टीव्ही 9 चे पत्रकार कै. पांडुरंग रायकरचे कुटुंब अजूनही सुप्रिया सुळे यांनी जाहीर केलेल्या मदतीच्या प्रतीक्षेत
- मुंबईतील इंटरनॅशनल हलाल शो इंडिया रद्द करा; हलाल सक्तीविरोधी कृती समितीचे आंदोलन
- नोकरीची संधी : भारतीय पोस्ट खात्यात 98083 पदांची मेगाभरती; फक्त 10 उत्तीर्णतेची अट
- 3 पुस्तके लिहून जिहादी दहशतवादाची चिरफाड करणारे इंटेलिजन्स ब्युरो अधिकारी आर. एन. कुलकर्णींची म्हैसुरूमध्ये हत्या