नको मला बंगला, नको गाडी पाहिजे; मोदी, मला सत्तेची चावी पाहिजे!!; खासदारकी मिळवल्यावर राहुलचे “नवे गाणे”!!


विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली : नको मला बंगला, नको गाडी पाहिजे; मोदी, मला सत्तेची चावी पाहिजे!! असे “नवे गाणे” राहुल गांधी खासदारकी पुन्हा मिळवल्यावर गाऊ लागले आहेत…!!Rahul Gandhi rejects offer of reacceptance his official bungalow 12 tughlak marg in new delhi

राहुल गांधींची खासदारकी पुन्हा बहाल झाल्यानंतर त्यांना मोदी सरकारने पुन्हा त्यांचा जुना 12 तुघलक मार्ग हा सरकारी बंगला स्वीकारण्याची ऑफर दिली. राहुल गांधींनी हा बंगला नाकारला आहे.राहुल गांधींनी देशातल्या सर्व मोदींना चोर ठरविल्यानंतर त्यांना सुरत कोर्टाने आणि गुजरात हायकोर्टाने दोन वर्षांची शिक्षा फर्मावली होती. त्यामुळे नियमानुसार त्यांची खासदारकी रद्द झाली होती. अर्थातच त्यामुळे लोकसभा सचिवालयाने त्यांचा दिल्लीतला सरकारी बंगला काढून घेतला. राहुल गांधींनी तुघलक रोडवरचा सरकारी बंगला खाली करून त्याच्या चाव्या मोदी सरकारकडे सोपविल्या आणि ते त्यांच्या आईच्या घरी राहायला गेले.

दरम्यानच्या काळात सुप्रीम कोर्टाने राहुल गांधींच्या शिक्षेच्या अंमलबजावणीला स्थगिती दिली. त्यामुळे त्यांची खासदारकी बचावली. ते संसदेच्या अधिवेशनात लोकसभेत हजर देखील राहिले. त्यांनी अविश्वास ठरावावर भाषण केले. याच दरम्यान लोकसभा सचिवालयाने राहुल गांधींना पुन्हा एकदा जुनाच 12 तुगलक मार्ग हा सरकारी बंगला अलॉट करून तो स्वीकारण्याची विनंती केली. मात्र राहुल गांधींनी सरकारचा हा बंगला नाकारला असून असे पत्रच त्यांनी लोकसभा सचिवालयाला लिहिले आहे.

राहुल गांधी 12 तुघलक लेन या बंगल्यात खासदार झाल्यापासून 19 वर्षे वास्तव्याला होते. मात्र त्यांना खासदारकी गमावल्यानंतर तो बंगला सोडावा लागला होता. आता त्या बंगल्यात पुन्हा जाण्याची त्यांची तयारी नाही. पण त्याचवेळी त्यांना दिल्लीच्या सत्तेची चावी मात्र नक्कीच हवी आहे. त्यामुळेच ते, “नको मला बंगला, नको गाडी पाहिजे; मोदी, मला सत्तेची चावी पाहिजे!!, हे गाणे म्हणत असतील यात संशय नाही.

Rahul Gandhi rejects offer of reacceptance his official bungalow 12 tughlak marg in new delhi

महत्वाच्या बातम्या 

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात