नाशिक : गॅस सिलेंडर साठी सामान्य माणसांची होरपळ; पण राहुल गांधींचा कट विरोधकांचे संसदेच्या पायऱ्यांवर चहा बिस्कीट खाऊन आंदोलन!!, असला प्रकार आज समोर आला. Rahul Gandhi
अमेरिका आणि इराण यांच्यातल्या युद्धामध्ये सगळे जग संकटात सापडले. सगळीकडे गॅस आणि तेल टंचाई झाली. त्याचा फटका जगभरातल्या सर्वसामान्य माणसांना बसला. भारत गॅस आणि तेलासाठी इतर देशांवर अवलंबून असल्याने या दोन्ही वस्तूंचा पुरवठा मर्यादित झाला. त्याचा फटका सर्वसामान्य भारतीयांना बसला.
#WATCH | Delhi | LoP, Lok Sabha, Rahul Gandhi joins Opposition protest staging a protest in the Parliament premises over the reports of nationwide shortage of LPG gas cylinders pic.twitter.com/DbpU45ecsu — ANI (@ANI) March 12, 2026
#WATCH | Delhi | LoP, Lok Sabha, Rahul Gandhi joins Opposition protest staging a protest in the Parliament premises over the reports of nationwide shortage of LPG gas cylinders pic.twitter.com/DbpU45ecsu
— ANI (@ANI) March 12, 2026
भारताच्या हिताला प्राधान्य
केंद्र सरकारने जीवनावश्य वस्तूंसंदर्भात मेस्मा कायदा लागू करून गॅस टंचाई आटोक्यात आणायचा प्रयत्न केला. परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी इराणच्या परराष्ट्र मंत्र्यांशी चर्चा करून आखातातल्या होर्मूजच्या खाडीतून भारतीय जहाजांना सेफ पॅसेज मिळवून घेतला. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सुद्धा अनेक राष्ट्र प्रमुखांशी चर्चा करून युद्धासंदर्भात शांततापूर्ण काढायचा प्रयत्न केला. पण यात त्यांनी कुठे फारशी भाषणबाजी केली नाही किंवा उगाच शांततेचे ढोल पिटले नाहीत. ते इतर देशांच्या राष्ट्रप्रमुखांना उपदेश करायच्या फंदात पडले नाहीत. युद्धादरम्यान भारताचे हित कशात आहे, हे ओळखूनच त्यांनी इराण आणि रशिया यांना प्राधान्य देत तेल आणि गॅस खरेदी चालविली. जयशंकर यांनी आपली मूत्सद्देगिरी पणाला लावून होर्मूजच्या खाडीतून भारतीय जहाजांना सेफ पॅसेज मिळवून घेतला.
विरोधकांनी घालविले गांभीर्य
पण या सगळ्या बाबी विरोधकांच्या पचनी पडल्या नाहीत. त्यांनी गॅस आणि तेल टंचाईसाठी मोदी सरकारला जबाबदार धरत कालपासून दिल्लीत आंदोलन केले. पण आज त्या आंदोलनात विरोधकांच्या अक्कलेने “कळस’ गाठला. राहुल गांधींच्या सगळ्या विरोधकांनी संसदेबाहेर आंदोलन केले. नाम नरेंदर, नही सिलेंडर!!, अशा घोषणा दिल्या. त्याच्या पुढची कृती करून मात्र विरोधकांनी सगळ्या आंदोलनातले गांभीर्य घालवून टाकले. राहुल गांधींच्या सकट सगळ्या विरोधकांनी संसदेच्या पायऱ्यांवर बसून चहा बिस्किटे खाल्ली. चहा बिस्किटे खाताना त्यांनी एकमेकांशी गप्पा मारल्या. कोणी फोनवर बोलले. संसदेच्या कॅन्टीन मधल्या वेटर्सनी या सगळ्यांना चहा बिस्किटे आणून दिली. या तथाकथित आंदोलनाचा व्हिडिओ सगळीकडे व्हायरल झाला. त्यामुळे विरोधकांच्या आंदोलनाचे ढोंग उघड्यावर आले.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App