प्रतिनिधी
मुंबई : काँग्रेसचे युवा प्रदेशाध्यक्ष सत्यजित तांबे यांनी नाशिक पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी अपक्ष उमेदवारीचा अर्ज दाखल केल्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. सत्यजित तांबे यांची आता पक्षातून हक्कालपट्टी करण्याचे घाटत आहे. Rahul Gandhi did not need to speak on Savarkar; Prithviraj Chavan’s gang
एकीकडे काँग्रेसमध्ये ही खळबळ सुरू असताना दुसरीकडे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी काँग्रेसला घरचा आहेर दिला आहे. भारत जोडो यात्रा महाराष्ट्रात असताना राहुल गांधींना सावरकरांवर बोलण्याची गरज नव्हती, अशा शब्दांत पृथ्वीराज चव्हाणांनी राहुल गांधींना टार्गेट केले आहे.
सावरकरांचा अपमान : राहुलजींची भारत जोडो यात्रा निम्मी सरली, महाराष्ट्रातून गेली, तरी टीआरपीची भीती अजून नाही संपली!
काँग्रेसला केवळ यात्रेमुळे यश मिळणे अवघड आहे. निवडणुकीत यश मिळवायचे असेल तर काँग्रेसची संघटना मजबूत केली पाहिजे. भारत जोडो यात्रा महाराष्ट्रात असताना राहुल गांधींनी स्वातंत्र्यवीर सावरकरांवर बोलण्याची गरज नव्हती, असे परखत मत पृथ्वीराज चव्हाण यांनी एका वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत व्यक्त केले आहे.
पृथ्वीराज चव्हाण म्हणाले की, ‘नाशिक पदवीधर निवडणुकीत काँग्रेसची फजिती झाली आहे. काँग्रेसमध्ये निवडणूक प्रक्रियेतून लोकं निवडले न गेल्याने हा घोळ झाला आहे.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App