राहुल गांधी लोकसभेत आले, पण भाषण नाही केले; अविश्वासाच्या भाषणांमधून आजी-माजी शिवसैनिक गाजले!!

विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली : राहुल गांधींचे संसद सदस्य पुन्हा बहाल झाले त्यामुळे काँग्रेस जणांनी राहुल गांधी जणू “पंतप्रधान” झाले असा जो आनंद व्यक्त केला होता, तो आनंद आज लोकसभेत मात्र दिसला नाही. मोदी सरकार विरुद्धच्या अविश्वास ठरावाच्या भाषणाची सुरुवात राहुल गांधी करतील, अशा राजकीय अटकळी अनेकांनी बांधल्या. पण या अटकळी आज तरी फोल ठरल्या. राहुल गांधींनी आज भाषणच केले नाही. त्या ऐवजी काँग्रेसने आसाम मधले खासदार गौरव गोगोई यांना अविश्वास ठराव मांडण्याची संधी दिली. त्यांनी चांगले भाषण केले आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींना तीन प्रश्न विचारले.Rahul Gandhi came in loksabha, but didn’t speak today, but shivsainiks roared today in loksabha

पण त्यानंतर लोकसभेत अनेकांची भाषणे झाली, तरी आज आजी-माजी शिवसैनिक हेच लोकसभेत गाजले.

शिंदे गटातून खासदार डॉक्टर एकनाथ शिंदे बोलले, ठाकरे गटातून अरविंद सावंत बोलले आणि त्यानंतर नारायण राणे थोड्याच कालावधीसाठी बोलले. पण या आजी-माजी शिवसैनिकांनी आज लोकसभा गाजवली.



श्रीकांत शिंदेंनी मोदी सरकार वरील अविश्वास ठरावावर बोलताना सरकारचे समर्थन केले. पण त्यापेक्षा ठाकरे गटावर जास्त कटाक्ष साधला. श्रीकांत शिंदेंना उत्तर देण्यात अरविंद सावंत यांनी जास्त धन्यता मानली. हिंदुत्वाच्या मुद्द्यावर मोदी सरकारला घेण्याचा प्रयत्न केला. बाळासाहेबांना देवळात घंटा बनवणारा हिंदू नको होता. अतिरेक्यांना मारणारा हिंदू हा हवा होता, असे ते म्हणाले.

पण अरविंद सावंतांनी मांडलेल्या हिंदुत्वाच्या मुद्द्यावर केंद्रीय मंत्री नारायण राणेंनी परखड उत्तर दिले. मोदी – शाहांवर बोलाल तर तुमची औकात दाखवेन, असा दम नारायण राणेंनी ठाकरे गटाच्या खासदारांना भरला.

अविश्वास ठरावाच्या मुद्द्यावर दिवसभरातल्या चर्चेत बाकीच्या सर्व खासदारांपेक्षा नारायण राणे यांचे तीन-साडेतीन मिनिटाचे भाषण आज लोकसभा गाजवून गेले. राहुल गांधी लोकसभेत परतले. त्यामुळे ते आज भाषण करण्याची अपेक्षा होती. पण त्यांनी भाषण केले नाही. त्यांच्या ऐवजी आजी-माजी शिवसैनिकांनीच आज लोकसभा गाजवून सोडली.

Rahul Gandhi came in loksabha, but didn’t speak today, but shivsainiks roared today in loksabha

महत्वाच्या बातम्या 

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात