विशेष प्रतिनिधी
नांदेड : अयोध्येत राम जन्मभूमी मंदिरात श्री रामलल्लांची उद्या अभिजीत मुहूर्तावर प्राणप्रतिष्ठा होत असताना संपूर्ण देश भगवा झाला आहे. परदेशातही भगवे वातावरण तयार झाले आहे. या भगव्या रंगाची विरोधकांनाही भीती वाटत आहे. त्यामुळे आपणही भगव्या रंगात रंगलेले आहोत, हे दाखविण्याची त्यांना राजकीय गरज आहे. ही राजकीय गरज भागवत काँग्रेसचे वरिष्ठ नेते आणि महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी नांदेडमध्ये रामाचे बॅनर झळकवले आहेत.Raghupati Raghava Raja Rama; Ashok Chavan will put up a banner!!
अशोक चव्हाण काँग्रेस सोडून भाजपमध्ये जाणार आणि भाजपकडूनच लोकसभेची निवडणूक लढवणार अशी चर्चा महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात बऱ्याच दिवसांपासून सुरू आहे. या पार्श्वभूमीवर अशोक चव्हाण यांनी झळकवलेल्या रामाच्या बॅनर्समुळे या चर्चेला पुष्टी मिळाली आहे.
पण अशोक चव्हाण हे मुरलेले राजकारणी आहेत. त्यांनी बॅनर लावताना कुठेही काँग्रेसचा उल्लेख केलेला नाही, फक्त “अशोक शंकरराव चव्हाण” या नावाने त्यांनी बॅनर्स लावले आहेत. पण त्यातही त्यांनी एक चतुराई केली आहे, ती म्हणजे त्यांनी महात्मा गांधी आपल्या नियमित प्रार्थनेत म्हणत असलेले भजन
*रघुपती राघव राजा राम पतित पावन सिताराम
ईश्वर अल्ला तेरो नाम सबको सन्मति दे भगवान
या ओळी बॅनर्सवर झळकवल्या आहेत. सोशल मीडियावर आधीच भाजपचा राम निराळा आणि महात्मा गांधींचा राम वेगळा अशी चर्चा सुरू असताना अशोक चव्हाणांनी कोदंडधारी रामाचा बॅनर झळकवला, पण त्यात महात्मा गांधींच्या भजनाच्या ओळी वापरल्या. ही त्यांची राजकीय चतुराई आहे. त्यातून काँग्रेस श्रेष्ठींना आपण अजूनही काँग्रेसमध्येच असल्याचा त्यांनी “संदेश” देण्याचा प्रयत्न केला आहे.
पण महात्मा गांधी रोजच्या प्रार्थनेत जे भजन म्हणत असत, त्या भजनात देखील त्यांनी भेसळच केली होती. कारण मूळ भजनामध्ये “ईश्वर अल्ला” हे शब्दच नाहीत. पंडित रामाचार्य यांच्या मूळ भजनात
रघुपति राघव राजाराम। पतित पावन सीताराम।।
सुंदर विग्रह मेघाश्याम। गंगा तुलसी शालीग्राम।।
भद्रगिरीश्वर सीताराम। भगत-जनप्रिय सीताराम।।
जानकीरमणा सीताराम। जय जय राघव सीताराम।।
हे शब्द आहेत आणि 1948 मध्ये श्रीराम भक्त हनुमान या सिनेमात हेच भजन गायले गेले आहे. यात “अल्ला” शब्द बिलकुल नव्हता.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App