वृत्तसंस्था
चंडीगड – पंजाबमध्ये काँग्रेसमधला तिढा पक्षाश्रेष्ठींनी लक्ष घालून सोडविण्याऐवजी वाढलाच आहे. मुख्यमंत्री अमरिंदर सिंग यांनी उघडपणे बंडाचा पवित्रा घेत थेट सोनिया गांधींनाच पत्र लिहून जबरदस्ती हस्तक्षेप न करण्याचा इशारा दिला आहे. Punjab CM captain amarinder singh openly dares to sonia gandhi not to induldge in congress affairs in punjab
या पत्रात ते म्हणतात, की पक्षश्रेष्ठींनी पंजाबमधील राजकीय परिस्थिती समजून घ्यायला हवी. राज्यातील परिस्थिती पक्ष नेतृत्वात बदल करण्यास अनुकूल नाही. असे पाऊल उचलण्यात आले तर त्यांची किंमत पक्ष आणि सरकार या दोघांनाही मोजावी लागू शकते. राज्यातील जुन्याजाणत्या नेत्यांकडे दुर्लक्ष केल्यास त्याचा विधानसभा निवडणुकीतील पक्षाच्या कामगिरीवर विपरीत परिणाम होऊ शकतो, असा इशारा अमरिंदर सिंग यांनी सोनिया गांधी यांना लिहिलेल्या पत्रात दिला आहे.
माजी मंत्री नवज्योतसिंग सिद्धू यांच्यावर राज्यात मोठी संघटनात्मक जबाबदारी सोपविण्यात येणार असल्याचे जवळपास निश्चित झाल्याची चर्चा असून सिद्धू यांनी सोनिया गांधी यांची त्यांच्या निवासस्थानी शुक्रवारी भेट घेतली. सिद्धू यांची प्रदेशाध्यपदी वर्णी लागणार असल्याची बातमी समोर आल्यानंतर अमरिंदर सिंह यांनी नाराजीचा पत्रातून सूर लावला आहे. या नाराजीच्या सूरात गर्भित इशाराही देण्यात आला आहे.
पंजाब काँग्रेसच्या नेतृत्वात बदल होणार असल्याच्या चर्चेच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी थेट पक्षाच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांना पत्र लिहून राज्याच्या राजकारणात जबरदस्तीने केला जात असलेला हस्तक्षेप थांबवण्याची विनंती केली आहे. पक्षाने पंजाबमधील परिस्थिती समजून घ्यावी, अन्यथा सरकार आणि पक्षाला मोठी किंमत चुकवावी लागेल, असा इशाराही त्यांनी दिला आहे.
Punjab CM captain amarinder singh openly dares to sonia gandhi not to induldge in congress affairs in punjab
महत्त्वाच्या बातम्या
- तालिबानला पाहिजेत 15 वर्षांपुढील मुली आणि 45 पेक्षा कमी वयाच्या विधवा, मौलवींना मागितली यादी, दहशतवाद्यांशी लावणार लग्न
- जम्मू-काश्मिरात बकरीदला गाय व उंट यांच्या कुर्बानीवर बंदी, सरकारकडून आदेश जारी
- महामारीदरम्यान देशात UPIच्या माध्यमातून वाढले डिजिटल व्यवहार, गतवर्षी झाले 41 लाख कोटींचे ट्रान्झॅक्शन
- टी-सिरीजच्या भूषण कुमारविरुद्ध बलात्काराचा गुन्हा दाखल, काम देण्याच्या आमिषाने 30 वर्षीय तरुणीवर अत्याचाराचा आरोप
- Maharashtra SSC Result 2021 : परीक्षेविना जाहीर झालेला राज्याचा १०वीचा निकाल ९९.९५%; कोकण विभाग १००%, तर नागपूरचा सर्वात कमी