विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : पंजाबमध्ये नवज्योत सिंग सिद्धू यांच्या हातात प्रदेश काँग्रेसची धुरा सोपवून आगीतून फुफाट्यात पडलेल्या काँग्रेस श्रेष्ठींना, “पंजाबचे झाले थोडे, छत्तीसगडमधून आले वादाचे घोडे”, असे म्हणायची वेळ आली आहे.Punjab became a little, the same “horses of controversy” came from Chhattisgarh; Chief Minister Bhupesh Baghela against Minister T. S. Singdev’s rebellion
पंजाबमध्ये नवज्योत सिंग सिद्धू यांना महत्त्वाचे पद देऊन देखील मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदरसिंग यांच्याविरोधातील बंडखोरी शमायला तयार नाही. कॅप्टन अमरिंदरसिंग आणि नवज्योत सिंग सिद्धू हे दोन्ही गट एकमेकांविरोधात शड्डू ठोकून जोरजोरात आजही भांडत आहेत.
भांडण इतके विकोपाला गेले आहे की पंजाबचे काँग्रेस प्रभारी हरीश रावत यांनी दोन्ही गटांपुढे अक्षरश: हात टेकले आहेत. साडेचार वर्षे सगळे ठीक चालले. पण आता ऐन निवडणुकीच्या तोंडावर या काँग्रेस नेत्यांना काय झाले आहे?, असा उद्विग्न सवाल त्यांनी पत्रकारांनाच केला आहे.
पंजाब काँग्रेस मध्ये अक्षरशः उभी फूट पडली आहे. ५ मंत्री आणि २५ आमदार अमरिंदर सिंग यांच्या विरोधात उघडपणे पुढे आले आहेत, तर अमरिंदरसिंग यांनी सुद्धा आपल्या गटाची बांधणी मजबूत करून काँग्रेसच्या नेत्यांवर दबाव आणायला सुरुवात केली आहे.
पंजाब काँग्रेस मधला पेचप्रसंग अधिकाधिक खोलवर रुतत चालला असताना छत्तीसगड मधला नेतृत्वाचा पेचप्रसंग वर उफाळून आला आहे. मुख्यमंत्री भूपेश बघेल यांच्याविरोधात छत्तीसगडचे मंत्री टी. एस. सिंगदेव यांनी बंड केले आहे. भूपेश बघेल आणि सिंग देव या दोन्ही नेत्यांनी काल राहुल गांधी यांची भेट घेतली. सुमारे तीन तास चर्चा झाली. परंतु सिंगदेव यांचे समाधान झालेले नाही.
छत्तीसगडमध्ये काँग्रेस मोठ्या बहुमतात निवडून आली असताना अडीच – अडीच वर्षांचा फॉर्म्युला ठरला होता.भूपेश बघेल यांच्या मुख्यमंत्रीपदाची अडीच वर्षे 17 जुलैला पूर्ण झाली आहेत. त्यांनी बाजूला होऊन आपला मुख्यमंत्रिपदाचा मार्ग मोकळा करून द्यावा.
कारण काँग्रेस श्रेष्ठींनी आपल्याला मुख्यमंत्रीपदाचे आश्वासन दिले होते, असे टी. एस. सिंगदेव यांचे म्हणणे आहे. ते आज काँग्रेसचे संघटन सचिव के. सी. वेणुगोपाल यांची स्वतंत्रपणे भेट घेणार आहेत. या भेटीत काही तोडगा निघण्याची सिंगदेव यांची अपेक्षा आहे.
परंतु पंजाब आणि छत्तीसगडमध्ये काँग्रेस पूर्ण बहुमतात असताना दोन्ही राज्यांमध्येपक्षामध्ये उभी फूट पडण्याची चिन्हे दिसत आहेत आणि काँग्रेस श्रेष्ठी मात्र तोडगा काढण्याच्या आणि दोन्ही गटांना गप्प करण्याच्या स्थितीत नाहीत, असे दिसत आहे
Punjab became a little, the same “horses of controversy” came from Chhattisgarh; Chief Minister Bhupesh Baghela against Minister T. S. Singdev’s rebellion
महत्त्वाच्या बातम्या
- आमच्या देशात दहशतवादी नकोत, अफगाणिस्तानमधील निर्वासितांना आश्रय देण्यास पुतीन यांचा विरोध
- चीनमध्ये जुलैपासून प्रथमच कोरोनाचा स्थानिक रुग्ण नाही, काटेकोर उपाययोजनांमुळे संसर्ग येतोय आटोक्यात
- तालिबानी राजवट: आता जागतिक बँकेने अफगाणिस्तानला मदत थांबवली , परिस्थितीवर व्यक्त केली गंभीर चिंता
- काश्मीर खोऱ्यात वर्षभरात १०२ दहशतवाद्यांचा खात्मा, लष्करेचे तीन दहशतवादी ठार