विशेष प्रतिनिधी
पुडुचेरी : केंद्रशासित प्रदेश असलेल्या पुडुचेरीला पूर्ण राज्याचा दर्जा मिळावा ही विनंती केंद्र सरकारने मान्य केली आहे, अशी माहिती पुडुचेरीचे मुख्यमंत्री एन. रंगसामी यांनी दिली.Puducherry’s request for full statehood granted by Center, Information of Rangsami
विधानसभेत 2021-22 च्या अर्थसंकल्पावरील चर्चेदरम्यान उत्तर देताना मुख्यमंत्र्यांनी ही माहिती दिली. मात्र, याबाबत अधिक तपशील सांगण्यास त्यांनी नकार दिला. रंगासामी पुढे म्हणाले की, त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना पुडुचेरीच्या अर्थसंकल्पाला ९०:१० या प्रमाणात केंद्रीय अनुदान मंजूर करण्याची विनंती केली आहे. यामध्ये केंद्राचा वाटा एकूण गरजेच्या ९० टक्के आणि पुडुचेरी सरकारचा हिस्सा १० टक्के आहे. सध्या हे गुणोत्तर ६०:४० आहे.
मागासवर्गीय विद्यार्थ्यांनी मागासवर्गीय महामंडळाकडून शिक्षणासाठी घेतलेली कर्जे माफ केली जातील. सरकारी नोकऱ्यांमधील विविध पदांच्या सर्व रिक्त जागा भरल्या जातील. लवकरच पोलीस कर्मचाऱ्यांची भरती केली जाईल.स्वातंत्र्य सैनिकांना निवृत्तीवेतन म्हणून राज्य सरकारच्या योजनेअंतर्गत देण्यात येणारी मासिक मदत सध्याच्या 9000 रुपयांवरून 10,000 रुपये करण्यात येईल, असेही रंगसामी यांनी जाहीर केले.
रंगसामी म्हणाले की, त्यांच्या सरकारने वैद्यकीय आणि अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांसाठी सेंट्रलाइज्ड अॅडमिशन कमिटी द्वारे निवडलेल्या विद्यार्थ्यांना शिकवणी फी भरण्यापासून सूट देण्याचा निर्णय घेतला आहे. हा खर्च सरकार उचलणार आहे. वृद्ध पत्रकारांना देण्यात येणारी मासिक मदत सध्याच्या 7500 रुपयांपासून 8000 रुपयांपर्यंत वाढवण्याची घोषणाही त्यांनी केली. वैद्यकीय पदवीधारकांना इंटर्नशिप भत्ता सध्या 5000 रुपयांवरून 20,000 रुपये केला जाईल.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App