पंतप्रधान नरेंद्र मोदी 864 दिवसांनी मणिपूरला गेले; पण 7300 कोटी रुपयांच्या विकास कामांची सौगात देऊन आले!!

Narendra Modi

विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी 864 दिवसांनी मणिपूरला गेले, पण तिथे जाऊन पेटवा पेटवी करण्यापेक्षा 7300 कोटी रुपयांच्या विकास कामांची सौगात देऊन आले. तिथे त्यांनी जाहीर सभेबरोबरच निवडक नागरिकांशी संवाद आणि रोड शो चे कार्यक्रम देखील केले. पण त्यांनी कुठेही पेटवा पेटवीचे भाषण केले नाही. उलट मी आणि केंद्र सरकार तुमच्या बरोबर आहोत, अशी ग्वाही देऊन ते मणिपूरच्या बाहेर पडले.Prime Minister Narendra Modi visited Manipur after 864 days;

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या मणिपूर दौऱ्याबाबत काँग्रेसने खूप मोठे अवडंबर माजविले. मणिपूरमध्ये हिंसाचार झाल्यानंतर 864 दिवसांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी तिथे फक्त 3 तासांसाठी जात आहेत, असा दावा केला. काँग्रेसचा दावा फक्त 3 तासांच्या मुद्द्यांपुरताच खरा ठरला. कारण मोदी मणिपूर मध्ये फक्त तीन तासच होते, पण त्या तीन तासांमध्ये मोदींनी काय केले. याविषयी मात्र काँग्रेसचे नेते काही बोलले नाहीत. पण या तीन तासांमध्ये मोदींनी 7300 कोटी रुपयांच्या कामाची भूमिपूजने आणि उद्घाटने केली. त्यांनी नागरिकांशी संवाद साधला. मणिपूरमध्ये शांततेसाठी केंद्र आणि राज्य सरकार मिळून प्रयत्न करू, अशी ग्वाही दिली. त्यांनी रोड शो देखील केला. काँग्रेसने त्या दौऱ्यावर टीकेच्या पलीकडे जाऊन काही केले नाही.



– मणिपूर दौऱ्यात पंतप्रधान मोदी म्हणाले :

– मणिपूरची भूमी ही धाडस आणि शौर्याची भूमी आहे, मी मणिपूरकरांच्या इच्छाशक्तीला सलाम करतो. मोठ्या पावसातही आपण सर्वजण इथे आलात, मी मणिपूवासीयांचे मनःपूर्वक आभार मानतो.

– मणिपूरच्या नावातच मणी आहे, हा तो मणी आहे जो आगामी काळात उत्तर पूर्व भारताची चमक वाढवणार आहे. मणिपूर हे बॉर्डरला लागून असलेलं राज्य आहे, येथे दळणवळण नाही. त्यामुळे, तुम्हाला जी अडचण आहे, ती मी जाणतो. 2014 पासून मी या राज्याच्या विकासाकडे लक्ष देऊन होतो. शहरांसह गावागावात रस्ते पोहोचविण्यासाठी प्रयत्नशील होतो. आता, राज्यात 8768 कोटी रुपयांच्या रस्त्यांचे काम सुरू आहे. चुराचाँदपुरा येथे 7,300 कोटी रुपयांच्या विकास कामाचे भूमिपूजन होत आहे.

– मिझोराम येथून आयझोल-दिल्लीदरम्यान पहिल्या राजधानी एक्स्प्रेससह इतर नव्या रेल्वेंना पंतप्रधान मोदींनी आज हिरवी झेंडी दाखवली. त्यामुळे, नॉर्थ इस्टमधील हे तीन राज्य आता थेट दिल्लीशी जोडले गेले आहेत.

– बंगाल अन् बिहार दौरा

– सायंकाळनंतर 14 सप्टेंबरपर्यंत मोदी आसाम दौऱ्यात भारतरत्न भूपेन हजारिका जन्मशताब्दी महोत्सवात सहभागी झाले.

– त्यानंतर, प. बंगालमध्ये 15 सप्टेंबरला कोलकात्यात संयुक्त कमांडर संमेलनाचे उद्घाटन करतील, तर बिहारमधील पूर्णिया येथे राष्ट्रीय मखाना महामंडळाचे उद्घाटन मोदी करतील.

Prime Minister Narendra Modi visited Manipur after 864 days; but returned with a gift of development works worth Rs 7300 crore!!

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात